कळंब प्रतिनीधी – कळंब तालुक्यातील गांधीनगर येथे 12 मार्च 2025 रोजी पहाटे 2 वाजता एक धक्कादायक घटना घडली. एका 21 वर्षीय युवतीवर दोन व्यक्तींनी घरात घुसून मारहाण आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे.
पीडित युवती आपल्या घरी झोपलेली असताना, पहाटे 2 वाजता तिच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवला. आतून विचारणा केल्यानंतरही बाहेरून प्रतिसाद न मिळाल्याने ती सावध होती. त्यानंतर, आरोपींनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि दरवाजा उघडला नाही म्हणून त्यांनी युवतीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
घाबरलेल्या युवतीने आपल्या आईला फोन करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि फोडून टाकला. त्यानंतर, त्यांनी युवतीचा हात धरून ओढले.
पोलिसांची कारवाई
घटनेनंतर युवतीने थेट कळंब पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपींवर विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले गेले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
या घटनेने गांधीनगर आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी हो
नागरिकांनी सतर्क राहून अशा घटनांची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.