वागदरी प्रतिनीधी (एस.के.गायकवाड ):
नुकतच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह नासिक येथे संबंध राज्य भरातील महाराष्ट्र शासन अनुदानित वसतिगृहे आणि आश्रमशाळा यांची कार्यशाळा सभा सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय सिरसाट यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती सभेस व कार्यशालेस महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून एकूण सर्व वासतिगृहाचे हजारो अधीक्षक, अधिक्षिका,संचालक, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.
यामध्ये फक्त बहुजन हिताय विद्यार्थी वासतिगृह उमरगा जिल्हा धाराशिवचा जाहीर गौरव
व सत्कार करण्यात आला.
या वसतीग्रहाचे आधिक्षक ध.प्रज्ञाजीत यांना मंचावर निमंत्रित करून,वसतिगृहाच्या माध्यमातून करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व उपक्रमाबद्दल. मान्यवराच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन, पाठीवर थाप देऊन. मुख्य समाज कल्याण संचालक पुणे, सामाजिक न्याय आयुक्त, महा. राज्य. आणि समाज कल्यान सचिव मंत्रायल म.रा. मुंबई विभागीय आयुक्त सह आयुक्त सामाजिक न्याय, माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप. व अन्य विभागातील सा.न्याय आयुक्त.व इतर मान्यवरांनी सांहृदय सत्कार केला. हा बहुजन हितायच्या इतिहासातील एकमेव अविस्मरणीय क्षण म्हणावा लागेल हा क्षण म्हणजे संघकार्याच्या व बहुजन हितायच्या कार्याचा सर्वोच्च गौरव होय.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.बहुजन हिताय वसतीग्रहाच्या झालेल्या या गौरवा बदल सर्वत्र अभिनंदन होत आहे