भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा—————————————-नळदुर्ग प्रतिनिधी (दादासाहेब बनसोडे )
दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त भानुदासराव चव्हाण महाविद्यालया, लोहारा. येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा शाल, फेटा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल अकॅडमीच्या प्राचार्य सौ. मधुमती गोरे व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून सारिका पाटील, यांनी विद्यार्थी व उपस्थित महिलांना व उपस्थिताना मार्गदर्शन करत असताना महिला दिनाचा इतिहास सांगून समाजामध्ये महिलांना वावरत असताना निर्भयपणे जगता येण्यासाठी समाजातील वातावरण बदलणे गरजेचे आहे
स्वतः महिलांनीही निर्भय होणे तितकेच गरजेचे आहे व तसेच घरामध्ये वडिलांच्या जबाबदारी बरोबरच आईची, मातांची जबाबदारी किती महत्त्वाचे असते हे सांगितले. याशिवाय अध्यक्ष समारोप करत असताना मधुमती गोरे यांनी महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचार लक्षात घेता महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी ही सर्वांचीच आहे तसेच पालकांकडून लहान वयातच विवाह करण्याची कारणे ही मुलींच्या संरक्षणा संदर्भात उद्भवणाऱ्या समस्या हे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, प्रा. स्वाती निकम, हॅलो मेडिकल फाउंडेशनचे सतिश कदम व स्वाती पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सानिका बदुले यांनी केले तर आभार प्रा. रूपाली कोटणूर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.