जळकोट ( अरुण लोखंडे) :- तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशाला जळकोट येथील शालेय मुलीनी रंगपंचमी निमित्त अनेक रंगाची मुक्तपणे उधळण करून सामाजीक एकतेचा सामानतेचा आणि शैक्षणिक उपक्रमाचा संदेश देवून रंगपंचमी अंत्यत आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली

याबाबत प्राप्त माहिती अशी की रंगपंचमी म्हणजे रंगाचा सण हा सण होळीच्या पाचव्या दिवशी साजरी केला जातो काही ठिकाणी हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि उत्तर भारताच्या काही भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यांचेच अवचित्य साधून येथील जिल्हा परिषद प्रशालेतील कृतीशिल सहशिक्षिका सौ पुष्पलता कांबळे यांनी रंगाची उधळण करून मुलीच्या हातावर रंगाचे गोंधवण काढून नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवता वाढवी म्हणुन शासनाने विविध शैक्षणिक उपक्रम चालू केलेले आहेत त्यामधे एनईपी ‘ 2020 एफ एल एन ‘ एसक्यूएएएफ निपुण भारत हा उपक्रम व हिंदू नववर्षाच्या सुरवातीचा जो सण आहे तो गुडी पाडवा या सना दिवशी शाळेतील शिक्षकांनी नवागत विद्यार्थ्यांच्या घरो घरी जावून जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत पालकांना माहीती देणे व शिक्षण रूपी संदेश गुडी पाडवा सण आनंदाने साजरा करा व आपल्या शाळेचा पट वाढवा . हा संदेश रुपी नारा देण्यात यावा व या बरोबरच शाळेतील मुलीनी आपल्या हातावर गोदवण रूपी रंगाने रंगवून रंगपंचमीच्या निमित्ताने गुणवत्ता वाढीसाठी शुभेच्छात्मक संदेश देण्यात येवून रंगपंचमीचा आनंद लुटला ही एक अगळी वेगळया पद्धतीने रंगपंचमी साजरी केल्याने शिक्षीकेसह मुलीचे कौतुक होत आहे .






