नंदगाव, ( प्रतिनिधी अजिंक्य मस्के)
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव व परिसरात मटका, जुगार, देशी विदेशी, हातभट्टी दारू, हे अवैध धंदे जोमात सुरू आहेत, बघाल तिकडे दारूच दारू दिसतेय ज्याला जास्त गरज आहे त्याला फोन करताच घरपोच दारू मिळत असल्याची हि चर्चा आहे.
या बाबत सविस्तर व्रत असे की, तुळजापूर तालूक्यातील नंदगाव व परिसरात अवैध धंद्याना उत आला आहे. गावठी दारू चे प्रमाण नंदगाव मध्ये अतीच झाले आहे. गावठी दारू देशी विदेशी दारू म्हणजे भाजी पाला झाल्यासारखा झाला आहे उठेल तो दारू विक्री करीत आहे, दारू रोड वर शाळेचा बाजूला मंदिराच्या बाजूला, गल्यांमध्ये पाहिजे तिकडे गावठी दारू राजरोस पणे खुलेआम दारू विक्री केली जात आहे, जुगारला तर सांगताच बस गावात कोठेही जावा जुगार चालूच हुतात्मा स्मारक असो कि, समाज मंदिरे असो कि देवालय असो कि शेत असो या ठिकाणी खुले आम जुगार चालू आहेत त्यात
मटका तर काय कल्याण जेऊ देत नाही व मुंबई झोपू देत नाही अशी परस्थिती झाली आहे आणि त्यात भर पडली आहे चक्रीची या सर्व अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी बरबाद होतच आहे. कित्येक युवकांचा जीव गेला आहे याकडे कोणी गांभीर्याने पाहणार आहे की नाही?
गावात सरपंच,पोलिस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष,पुढारी नेते असून व नळदुर्ग पोलिस स्टेशन मध्ये फौजफाटा तुळजापूर पोलिस ठाण्याचा मोठा फौजफाटा असतानाही एवढे अवैध धंदे चालतातच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे तरुण पिढी व्यसनाधिन होत असून दारूमुळे दररोज पती पत्नी मध्ये वाद होताना दिसून येत आहे. वादाचे रुपांतर भांडणात होते. भांडण विकोपाला जाऊन जीवे चालली आहे
या सर्व बाबींकडे मा. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव साहेबांकडून महिलांना आशा आहेत कि अवैध धंद्यांवर कारवाई करून त्यांनीच अशा बाबीना पायबंद घालतील व तरुण पिढी बरबाद होण्यापासून वाचवतील अशी मागणी नागरिकांमधून होतांना दिसून येत आहे.