विजय पिसे जळकोट (आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर) : दिनांक २ रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धाराशिव चे नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री कीर्ती कुमार एच पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मयांक घोष यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना धाराशिव जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली या बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व संबंधित सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते या बैठकीस श्री संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेचे नागपूर विभाग व छत्रपती संभाजी नगर विभागाचे अशासकीय सदस्य श्री प्रवीण पवार धाराशिव जिल्हा अशासकीय सदस्य श्री संतोष चव्हाण श्री विलास राठोड श्री अतुल राठोड श्री राणीताई राठोड, श्री पिंटू राठोड श्री विकी राठोड आधी जण उपस्थित होते सदर बैठकीत जिल्ह्यामध्ये बंजारा तांडा चे नवीन ग्रामपंचायत विभाजन करण्यासाठी सुमारे 48 नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच सर्व संबंधित विभागास लवकरात लवकर बंजारा समाजाच्या तांड्याचे ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत प्रस्ताव दाखल करण्यासाठी संबंधितास निर्देश देण्यात आले.. ग्रामपंचायत विभाजन लवकरात लवकर व्हावे अशी मागणी संतोष चव्हाण जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली .