जिल्हा प्रतिनिधी (शाम नागिले )अचलेर मध्ये अवैध धंद्यांनी सद्या मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे. अचलेर बीट चे
अंमलदार यांच्या दुर्लक्षपणामुळे अचलेर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे श्री मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेत हातभट्टीची दारू उदंड झाल्यामुळे देवाच्या पालखी मिरवणुकीत दारुड्यानी गोंधळ घातला तर चोरांनी आपले हात ओले करून घेतले
केवळ तीन होमगार्ड यात्रेत बंदोबस्ताला होते,
अचलेर मध्ये यात्रा काळात हातभट्टीची दारू अड्डे बंद करण्यात यावेत तसेच अवैध धंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी करूनही या कडे पोलिस खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे यात्रेत हातभट्टीच्या दारूचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आणि हातभट्टीची दारू विक्री करणारे आणि हातभट्टी अड्डे चालविणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर फावले
यास केवळ पोलिस खात्याचे दुर्लक्ष असल्याचे कळते.
अचलेर चे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेस पाच दिवस अवैध धंद्यांना आळा घालण्यात यावे आणि हातभट्टीची दारू अड्डे बंद ठेवण्यात यावे अशी मागणी अचलेर चे बीट अंमलदार वाघमारे यांच्याकडे करण्यात आली होती परंतु त्यांनी या मागणी कडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच अचलेर येथे यात्रा काळात आणि दररोजच हातभट्टीची दारू अड्डे सुरू असुन अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे
एस टी स्टँड परिसरात तसेच शाळा परिसरात आणि भीमनगर मध्ये हे हातभट्टीची दारू अड्डे असून गावात सर्वत्र इतर अवैध धंद्यांनी उच्चांक गाठला आहे. गावात सर्वत्र गुटखा राजरोस पाने विक्री केला जात असून हा गुटखा कोण विक्री करतो? हातभट्टीची दारू अड्डे कुणाचे आहेत? अवैध धंदे कोण करत आहेत हे सर्व पोलिस यंत्रणेला माहिती असून ही त्याकडे पध्दतशीर आणि अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे
*अचलेर बीटचे हवालदार यांची मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार: संजय रणदिवे*
अचलेर मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. त्यांनी या अवैध धंद्यांकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले आहे त्यामुळे त्यांची तक्रार आपण मुख्यमंत्री यांच्याकडे देणार आहे अशी माहिती भीमशक्ति सामाजिक संघटनेने राज्य सचिव संजय रणदिवे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.