spot_img
spot_img
spot_img

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी विचारांची प्रेरणा आणि कुटूंबातील प्रत्येक व्यकीने दिलेली समर्थ साथ यामुळेच मी पोलीस उपनिरिक्षक झाले : दैवशाला कांबळे – चंदनशिवे

वागदरी ( एस.के. गायकवाड ):

“जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशातील शासनकर्ती जमात बनायचं आहे”.असा प्रकारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी दिलेल्या विचारांची प्रेरणा आणि माहेर व सासर कडील दोन्ही कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीने दिलेली समर्थ साथ यामुळेचं मी पोलिस उपनिरिक्षक झाले.असे प्रतिपादन न्यूतन पोलीस उप निरीक्षक दैवशाला रामराज कांबळे – चंदनशिवे यानी वागदरी ता. तुळजापूर येथे बोलताना केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उपनिरिक्षक पदाच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करून पोलीस उपनिरिक्षक पदासाठी पात्र झालेल्या दैवशाला राजाराम कांबळे – चंदनशिवे यांचा वागदरी ता. तुळजापूर येथे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक राजा यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी व समस्त बौद्ध बांधवाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आपली आर्थिक परिस्थिती कितीही अनकूल असो किंवा प्रतिकूल असो मुलींनी पदवी पर्यंत शिक्षण पूर्णकरून जिद्द,चिकाटी मेहनत घेवून आत्मविश्वासने स्पर्धा परिक्षेची तयारी केल्यास यश निश्चित मिळते.तेंव्हा प्रत्येकानी शिक्षण घेऊन स्वतः च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमाचे पुजन करून सेवानिवृत्त पोलीस हवालदार संदिपान वाघमारे व त्यांच्या पत्नी कविता संदिपान वाघमारे यांच्या हस्ते नुतन पोलीस उपनिरीक्षक दैवशाला राजाराम कांबळे -चंदनशिवे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकात वाघमारे, अंबादास झेंडारे यांचे ही शुभेच्छा पर भाषणे झाली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस. के. गायकवाड यानी केले.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे नागनाथ बनसोडे, मोहन वाघमारे, दत्तू वाघमारे, उत्तम झेंडारे,अनिल वाघमारे,जेष्ठ कार्यकर्ते धुळाप्पा वाघमारे, कुंडलिक वाघमारे, कल्लाप्पा वाममारे, सहादेव वाघमारे, शिवाजी वाघमारे, अण्णासाहेब वाघमारे, रमेश वाघमारे, हणमंत वाघमारे, सुर्यकांत वाघमारे, बाबासाहेब वायमारे, नामदेव वाघमारे, बाळू वाघमारे, कमळाबाई वाघमारे, भाग्यश्री वाघमारे, माजी उपसरपंच कविता गायकवाड, इंदूबाई वाघमारे,मुक्ताबाई वाघमारे, गेंदाबाई वाघमारे,वंदना वाघमारे,श्रीदेवी वाघमारे, ठकूबाई वाघमारे, स्वाती गायकाड, कोमलं झेंडारे,

गीताबाई झेंडारे,सुनंदाबाई चंदनशिवे, विजयाबाई वाममारे सह महिला ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या