spot_img
spot_img
spot_img

प्रयाग मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी ली. च्या वतीने कर्मचारी गुण गौरव सोहळा संपन्न 

आवाज महाराष्ट्र न्युज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्रयाग मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड च्या वतीने संस्थेचे सन्मानित चेअरमन एडवोकेट सचिन तुकाराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली गुण गौरव सोहळा व प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक १०-४-२५ रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयात गुरुवारी सकाळी ९:३० वा. करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस जळकोट येथील शाखे मध्ये प्रथमता आई तुळजाभवानी च्या प्रतिमेचे पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रथमता प्रयाग मल्टीस्टेटच्या वतीने प्रयाग भूषण हा पुरस्कार पांडुरंग तुकाराम साखरे यांना प्रदान करण्यात आला व तसेच उत्कृष्ट अधिकारी म्हणून दिगंबर शिवाजीराव जाधव, व श्रीमती बालिका पंडित राजमाने तसेच उत्कृष्ट शाखाधिकारी सौ श्रद्धा विकास स्वामी व उत्कृष्ट पिग्मी एजंट ओंकार विठ्ठल कोळी यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी बँकेबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कदम व तज्ञ संचालक मोहन लक्ष्मणराव जाधव, विजयकुमार मोरे सर, मा. जि. प. सदस्य गणेशराव सोनटक्के, सचिन कदम,पंडित कदम, ब्रह्मानंद कदम, डॉ. संजय कदम, बबन मोरे, राजू राठोड, अजित खारे, दिनकर कलाल, ताजुद्दीन शेख, पत्रकार अरुण लोखंडे, वीरभद्र पिसे, विजय पिसे, संजय पिसे, मंगेश सुरवसे, अशोक कदम, नामदेव कागे, मनोज कदम व बँकेत तील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Related Articles

ताज्या बातम्या