वागदरी(एस. के. गायकवाड ) :
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डा बाबासाहेब आबेडकर याच्या 134 व्या जयंती चे औचित्य साधून व सविधानाच्या अम्रत मोहत्सवी वर्ष सांगता समारोह निमित्ताने दि. १९ एप्रिल २o२५ रोजी सकाळी ठिक ११.o वा. तुळजापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात देशाचे सामाजिक न्याय व अधिकारिता मत्री तथा रिपाइंचे राष्ट्रिय अध्यक्ष नामदार रामदास आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले तरी तुळजापूर तालुक्यातील तमाम रिपब्लिकन कार्यकर्ते व आबेडकरी आनुयायानी या सभेला मोठ्या सख्येने उपस्थित राहवे असे आवहान रिपाइ (आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश जाँइट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ यानी तुळजापूर येथे बोलताना केले.
तुळजापूर या ऐतिहासिक नगरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलने रास्तारोको आंदोलन आमरण उपोषण ठिय्या आंदोलन निदर्शने या सारखे विविध लढे ३० ते ३५ वर्षांपासून केले होते तेंव्हा हा पुतळा बसवण्यात आला असून भिम जल्लोष २०२५, डॉ. बाबासाहे आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने तुळजापूर येथिल डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आभिवादन करण्यासाठी रिपाइं च्या वतीने जाहीर आभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असून नामदार रामदास आठवले हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे महाराष्ट्र राज्य जाईनट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ यांची प्रपुख उपस्थिती राहणार आहे.
या सभेच्या पूर्व तयारीसाठी तुळजापूर येथिल शासकिय विश्राम ग्रहात रिपाइं आठवले कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकिच्या अध्यक्षस्थानी रिपाइं चे मराठवाडा विभाग उपाअध्यक्ष तानाजीं कदम हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइंचे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष आनंद पांडागळे हे होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजाभाऊ ओव्हाळ बोलत होते.
या वेळी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे, जिल्ह उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, रणजित गायकवाड, जिल्हा सचिव एस. के. गायकवाड, जिल्हा युवा कार्याध्यक्ष अरुण
लोखंडे,तुळजापूर विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम,तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम, युवा शहराध्यक्ष अमोल कदम, रोजगार आघाडी तालुका अध्यक्ष अप्पा कदम, प्रा. अशोक कांबळे,तालूका संघटक सुरेश लोंढे, रिपाइंचे बाळासाहेब सुरवसे, आनंद ढाले, किसन पांडागळे,बापु सोनवणे,रावि वाघमारे, तानाजी उमाजी कदम, वैजनाथ पांडागळे,प्रताप कदम,रनजीत मस्के, अनिल बनसोडे, बाबासाहेब हावळे,शंकर हावळे, तानाजी डावरे,मारुती खारवे,भास्कर पांडागळे,रमेश गायकवाड, नबाळासाहेब ढवळे,विलास सरवदे, रत्नाकर सरवदे, दाजी माने, सौदागर गायकवाड सह कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते.या याप्रसंगी रणजीत मस्के बाळासाहेब ढवळे विलास सरवदे यांचा रिपाइं मध्ये प्रवेश करण्यात आला यावेळी त्यांचे हार व पुष्पगुच्छ देऊन राजाभाऊ ओव्हाळ यांनी स्वागत केले