वागदरी ( एस. के. गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने निळा ध्वजारोहन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना आभिवादन करण्यात आले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी, सिद्धार्थ कला व क्रिडा मंडळ, सिध्दार्थ बुद्ध विहार कमिटी येडोळा यांच्या संयुक्त विद्यामाने येडोळा येथील भिमनगर मध्ये समाज मंदिराच्या प्रागणान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ न्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी सरपंच सौ.झीमाबाई रामसिंग जाधव व ग्रामविकास अधिकारी सौ.एस.एस. गोरे मॅडम यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पोलिस पाटील नरेश अरविंद जाधव यांच्या हस्ते निळा ध्वजारोहण करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेवून भारतरत्न डॉ.. बाबासाहेब आंबेडकर याना आभिवादन करण्यात आले. यावेळी भूषण पवार(उपसरपंच),दिगंबर पाटील (ग्रा. प. सदस्य), सामाजिक कार्यकर्त्या सौ.लक्ष्मी राजेंद्र जाधव (माजी उपसरपंच), कैलास गवळी ग्रुरुजी, चेतन जाधव,राजेंद्र जाधव(मेजर), शिवाजी जाधव, बाळु जाधव सह सिद्धार्थ क्रीडा व कला युवक मंडळ येडोळा,जयंती उत्सव कमिटी,सिद्धार्थ बुद्ध विहार कमिटी येडोळा चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, महिला व ग्रामस्त मोठ्या संख्याने उपस्थित होते.