वागदरी (प्रतिनिधी :
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथील भाजपाचे तुळजापूर तालुका सरचिटणीस विलास राठोड यांच्या सुविद्य पत्नी सौ. रंजना विलास राठोड यांची भाजपा नळदुर्ग ग्रामिण अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
नळदुर्ग येथिल भाजपाच्या संपर्क कार्यालयात आमदार ‘ .राणाजगजितसिंह पाटील व सुनिल मालक चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली तुळजापूर तालूक्यातील नळदुर्ग सर्कल मधिल प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठत भाजपा महिला आघाडीच्य नेत्या सौ. रंजनाताई विलास राठोड यांची भाजपा नळदुर्ग ग्रामिण सर्कल अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या सार्थ निवडी बदल वागदरी ता.तुळाजापूर येथिल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी भाजपा मिडिया सेल चे तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ, भाजपाचे युवा कार्यकर्ते अभिषक उर्फ बंटी पाटील, रिपाइं (आठवले) चे एस. के. गायकवाड, अनिल वाघमारे,दत्तू वाघमारे सह कार्यकर्ते उपस्थित होते.