आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला जळकोटची विद्यार्थीनी वैभवी विजय पिसे इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र व तसेच विश्व नारायण कदम हा इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत परीक्षेत पात्र झाल्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वीरभद्र पिसे, उपाध्यक्ष विजय पिसे व शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप तरमोडे यांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व पुढील शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पालक विजय पिसे ,नारायण कदम, शितल कदम, आणि वर्गशिक्षक जयराम शिंदे, वैष्णवी कदम यांचा सत्कार शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पलता कांबळे यांनी केले तर आभार संतोष सारणे यांनी मानले. शिष्यवृत्ती पात्र असणाऱ्या या दोन्ही विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख महाबोले साहेब, विस्तार अधिकारी जेट्टटे साहेब, व गावातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले आहे.