spot_img
spot_img
spot_img

अणदूर येथे पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध..

अणदूर प्रतिनिधी :  अणदूर तालुका तुळजापूर येथे जम्मू काश्मीरमधील पहलगाम‌ येथील अतिरेक्याने पर्यटकावर केलेल्या निर्दयी भ्याड हल्ल्याचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

नुकतच जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्याने निष्पाप पर्यटकावर गोळीबार करून हल्ला केला.

त्या हल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील आनेक‌ पर्यटकांचा निष्पाप बळी गेला. सदर घटनाही मानवतेला काळीमा फासणारी असून या निंदणी घटनेचा अणदूर येथील ग्रामस्थांच्या वतीने, अण्णा चौक . येथून निषेध फेरी करून जाहीर निषेध करण्यात आला व हल्लेखोर अतिरेक्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या प्रसंगी, राजकुमार गाढवे, अण्णासाहेब अलुरे, गजानन मोकाशे, आकाश आळंगे, सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Related Articles

ताज्या बातम्या