spot_img
spot_img
spot_img

महामानवाच्या जयघोषाने नळदुर्ग शहर दुमदुमले 

 

अनेक चौकात महामानवाला अभिवादन करण्यात आले .

राजरत्न बनसोडे यांचे अनेक चौकात सत्कार

नळदुर्ग प्रतिनिधी: दादासाहेब बनसोडे 

 

नळदुर्गच्या ऐतिहासिक नगरीमध्ये परमपूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये पार पडली प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके ,कुलस्वामिनी बोअरवेल चे मालक चंद्रकांत बनसोडे , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे सेवा निवृत्त नायब सुभेदार दिगंबर बनसोडे , डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्य प्रवर्तक संस्थापक मारुती खारवे जयंती

कमिटीचे अध्यक्ष राजरत्न बनसोडे , माजी नगरसेवक किशोर बनसोडे , रिपाइचे शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे , सामाजिक कार्यकर्ते योगेश सुरवसे , बापू दूरकर विठठल बापू बनसोडे , नेताजी बनसोडे फुलचंद सुरवसे ,दादासाहेब बनसोडे यांच्या प्रमुख हस्ते पूजन करण्यात आले यावेळी बौद्धाचार्य तथा पत्रकार दादासाहेब बनसोडे व कुमार ढेपे यांनी सर्वांना त्रिशरण पंचशील दिले व समता सैनिक दलाच्या सैनिकांनी महामानवाला मानवंदना दिली . हि मिरवणुक बुद्ध विहारा पासुन ढोल ताशाच्या व लेझीम पथकाच्या गजरात सुरवात करण्यात आली यावेळी नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले यामध्ये शिवसेना उबाठाचे शहर प्रमुख संतोष पुदाले , भाजपाचे भिमाजी घुगे , माजी नगरसेवक बसवराज धरणे , सुधीर भैय्या हजारे नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , विलास येडगे श्रीनिवास भोसले , माजी नगरसेवक विनायक अहंकारी , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , पत्रकार आयुब शेख , समीर शेख ,लहुजी शक्ती सेनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड रघुनाथ आप्पा नागणे , उत्तम बनजगोळे , व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले , संतोष मुळे नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक दीपक कांबळे , फुलचंद सुरवसे विकास कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती कमिटीचे अध्यक्ष राजरत्न बनसोडे यांचा सत्कार पक्षांच्या संघटनेच्या नगर परिषदेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला ही मिरवणूक बुद्ध विहार हायवे रोड कसाई गल्ली , ऐतिहासिक किल्ला गेट , पोलीस ठाणे , क्रांती चौक , ऐतिहासिक चावडी चौक शास्त्री चौक , जय भवानी चौक , अहिल्याबाई होळकर चौक , नवी बाजारपेठ ते लोकमान्य वाचनालय डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक अक्कलकोट रोड , बुद्ध नगर डॉ आंबेडकर नगर , बुद्ध विहारा समोर येऊन मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले यावेळी नळदुर्ग येथील बौद्धाचार्य तथा पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी सर्व पदाधिकारी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते यामध्ये सर्व कार्यकर्ते सर्व शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि त्रिशरण पंचशील दिले

डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांच्याकडून पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले

यावेळी नळदुर्ग येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग ऐतिहासिक नगरीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता आणि समता सैनिक दलाच्या सैनिकानी मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदविला आणि सर्व बौद्ध उपासक उपासिकांना संरक्षण दिले शेवटी आभार दादासाहेब बनसोडे यांनी मानले .

Related Articles

ताज्या बातम्या