spot_img
spot_img
spot_img

सिंगोली येथे महिलांनी पुढाकार घेत केली धुमधडाक्यात भीम जयंती साजरी.*

 

धाराशिव प्रतिनिधी *भारतीय राज्यघटनेचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती दि.२९/०४/२०२५ रोजी सायंकाळी ०६:०० वाजता मौजे शिंगोली ता. धाराशिव येथे मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली. या जयंतीचे विशेष म्हणजे जयंती मध्ये डीजेला फाटा मारत बॅन्जो पार्टीच्या ढोल ताशाच्या तालावर मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या सर्व

 

भीमसैनिक आणि भीम कन्यांनी ठेका धरला. अतिशय शिस्तीत आणि आनंदामध्ये हा नेत्र दीपक भीम जयंतीच्या मिरवणुकीचा सोहळा संपन्न झाला. यावेळी तुळजापूर तालुक्यातील मौजे

 

बाभळगाव आणि तुपाचे बोरगाव येथील लेझीम पथकांनी आपला सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावर्षीच्या भीम जयंती ची सर्व जबाबदारी महिलांनी पुढाकार घेऊन वैचारिक जयंती पार पडली. अध्यक्ष म्हणून सिंधू लोंढे, उपाध्यक्ष कांचन वाघमारे, सचिव सुकशाला वाघमारे, कोषाध्यक्ष अर्चना तुपरे, कार्याध्यक्ष कांचन

 

वाघमारे, मार्गदर्शक ज्योती वाघमारे, मिरवणूक प्रमुख म्हणून शीला गायकवाड आदींनी काम पाहिले. अतिशय शिस्तीमध्ये आणि शांततेमध्ये हा भीम जयंतीचा दिमाखदार सोहळा यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल या महिलांचे धाराशिव जिल्ह्यातून कौतुक होत आहे.ह्या जयंतीचे नियोजन करण्यासाठी राजगृहाचे कट्टर समर्थक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा संघटक बाबा वाघमारे, आणि त्यांच्या टीमने, मोहन वाघमारे.सचिन वाघमारे,सुहास वाघमारे,दीपक वाघमारे,बबलू लोंढे,अजय वाघमारे मनेश वाघमारे, मिरवणूक चित्रनाचं अर्थात सिसीटिव्हीचं काम मिथुन वाघमारे यांनी केले, प्रत्येक गावात महिला मंडळ आहे.यापुढे धाराशिव जिल्हाभरातुन महीला मंडळाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे नियोजन व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,या शिंगोली गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूकीत समस्त बौद्ध समाज उपासक उपाशीका आदिनी परिश्रम घेतले…

 

*✍️ बाबा वाघमारे

Related Articles

ताज्या बातम्या