जळकोट (अरुण लोखंडे) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील फुले शाहू शिव आंबेडकरी चळवळीत नेहमी सक्रीय राहाणाऱ्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयत्ती उत्सव कमेटीच्या सदस्या श्रीमती जिजाबाई भगवान लोखंडे यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी अल्पशा आजाराने पुणे येथील सिबॉयसेस हॉऊसपिटल मध्ये उपचारादरम्यान मरण पावल्या . त्या सर्व सामाजीक कार्यात सतत हिरारीने भाग घेत असत सर्वाच्या सुख दुःखात सहभागी होत असत त्यांच्या जीवनात त्यांनी सामाजीक बाधीलकी कायम जपण्याचा नेहमीच प्रत्यन केल्या आहेत .
त्यांच्यावर त्याच्या मुळगावी जळकोट येथील निर्वाण भुमी मध्ये बौद्ध धम्म पद्धत्तीने अंतिम संस्कार करण्यात आले असून त्यांच्या अंत्ययात्रेत सामाजिक शैक्षणिक राजकीय मंडळी उपस्थित होते त्यांच्या पश्च्यात दोन मुले दोन मुली जावाई नातवंडे असून त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .