spot_img
spot_img
spot_img

वागदरीत बुद्ध जयंती निमित्ताने पंचशील ध्वजारोहण करून तथागताना आभिवादन

वागदरी (एस.के. गायकवाड):

वैशाखी पोर्णिमा तथागन गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने वागदरी ता.तुळजापूर येथे पंचशील ध्वजारोहण करून भगवान गौतम बुध्द याना आभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरी च्या वतीने बुद्ध जयंती निमित्ताने आभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन येथील पंचशील बुध्द विहारात करण्यात आले होते. प्रारंभी जयंती उत्सुव कमितीचे अध्यक्ष नागनाथ बनसोडे, उपाध्यक्ष मोहन वाघमारे,खजिनदार दत्तु नाना वाघमारे, अनिल वाघमारे, चंद्रकांत वाघमारे आदी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुध्द व महामानव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमांचे पुजन करून पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणा नंतर सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेवून तथागत भगवान गौतम बुध्द याना आभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन रिपाइं (आठवले)चे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाडय यानी केले तरअभार प्रदर्शन चंद्रकांत वाघमारे यानी केले. यावेळी पोलीस हवालदार संदीपान वाघमारे,भिमशाहीर शिवाजी वाघमारे, जेष्ठ कार्यकर्ते कुंडलिक वाघमारे, सुर्यकांत कामारे, माजी उप सरपंच कविता गायकवाड, ग्रा.प. सदस्या गुनाबाई बनसोडे, कविता संदीपान वाघमारे,.न गेंदाबाई बनसोडे, विजयाबाई वाघमारे,कमलबाई धाडवे, बाई भागवत वाघमारे सह कार्यकर्ते उपस्थित होने

Related Articles

ताज्या बातम्या