spot_img
spot_img
spot_img

डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थानी बाजी मारली 

 

———————————————-

सलग पाचव्यांदा नळदुर्ग केंद्रांत येऊन पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध केली आहे

 

नळदुर्ग .दादासाहेब बनसोडे

 

नळदुर्ग येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मेडीयम स्कुलचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असुन निकालामध्ये नळदुर्ग केंद्रात प्रथम येण्याचा मान सलग पाचव्यांदा या शाळेने मिळवुन आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या शाळेचे शंभवी बेंचमर्डीमठ ९६ . ४० व हजिफा शेख ९६ . ४० टक्के गुण मिळवत नळदुर्ग केंद्रात संयुक्तपणे प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मारुती खारवे व शाळेच्या मुख्याध्यापिका कविता पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

शालांत माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (एसएससी) निकाल दि. १३ मे रोजी जाहीर झाला आहे. दहावी परीक्षेच्या निकालामध्ये याहीवर्षी अपेक्षेप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. नळदुर्ग येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मेडीयम स्कुलचा दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेच्या ३७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी सर्व 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विशेष म्हणजे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सलग पाचव्यांदा केंद्रात प्रथम येण्याचा मिळविला आहे. डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मेडीयम स्कुल ही शाळा गुणवत्तेच्या बाबतीत सर्वात पुढे आहे हे पुन्हा एकदा दहावी परीक्षेच्या निकालावरून सिद्ध झाले आहे.

या शाळेचे विद्यार्थी शंभवी बेंचमरडीमठ ९६ ४० हजिफा शेख ९६ .४० टक्के गुण मिळवत संयुक्तपणे नळदुर्ग केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.या त्याचबरोबर स्वयंम पाटील ९६ .४० %,शिवराणी कोरे ९६ २० %,साक्षी कांबळे ९६% ओम राठोड ९५ . ४०%, रोशिका हजारे ९५ ४०% प्रतीक राठोड ९५ ४० प्रसाद चिमणे ९५ २० %, सलोनी कुलकर्णी ९४ . ४०%, कमल मेहराज ९४ . ४० %, हसीर काजी ९४%, शुभम राठोड ९३ . ८० %,संस्कृती सुरवसे ९३ . ६०%, ऋग्वेद पुदाले ९३ . ४०%, नीरज छत्रे ९३%गुण मिळविले आहे. या शाळेचे सर्वच विद्यार्थी विशेष प्राविण्यासाह उत्तीर्ण झाले आहेत. डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मेडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यशाच्या परंपरेत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.

संस्थेचे अध्यक्ष मारुती खारवे शाळेच्या मुख्याध्यापिका कविता पाटील व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या