spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग येथे सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत सुरवसे यांची निर्घृण हत्त्या या हत्तेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.

या हत्ते प्रकरणी बाप-लेकावर गुन्हा दाखल.

या नराधमाला फाशीच झाली पाहिजे पिड़ीत पत्नीचा आक्रोश

नळदुर्ग : दादासाहेब बनसोडे 

नळदुर्ग येथे दि. २७ मे रोजी किरकोळ कारणावरून एका सामाजिक जाणीवेच्या कार्यकर्त्याची कोयत्याने सपा सप वार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याने नळदुर्ग शहरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्याकांडाने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते. हत्या केल्यानंतर आरोपी स्वता पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.

         याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दि. २७ मे रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग येथील शिवराज बार ॲड हॉटेल समोर तु नेहमी समाज सेवेमध्ये का भाग घेतोस, तु नळदुर्गचा आहेस का आणि नळदुर्गला का येतोस या कारणावरून जयकुमार गायकवाड व सुर्यकांत (पप्पु) सुरवसे यांच्यात वाद झाला या वादानंतर जयकुमार गायकवाड यांने आपला मुलगा सोहन गायकवाड याला बोलावुन घेतले यावेळी सोहन हातात कोयता घेऊन आला आणि त्यांने थेट सुर्यकांत (पप्पु) सुरवसे वय ४८ वर्ष यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले हा हल्ला इतका भिषण होता की यामध्ये सुर्यकांत (पप्पु) सुरवसे यांचा जागीच मृत्यु झाला.

सुर्यकांत (पप्पु) सुरवसे हे नेहमी समाज कार्यात अग्रेसर राहत होते सामाजिक धार्मिक राजकीय कार्यात सतत पुढे होऊन काम करत आसत मात्र किरकोळ कारणावरून त्यांची निर्घृण हत्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

         घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे पोलीस उप निरीक्षक इश्वर नांगरे , पोलीस उप निरीक्षक संतोष गिते व इतर पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जावुन परिस्थिती व्यवस्थित हाताळली.

        मयत सुर्यकांत (पप्पु) सुरवसे यांच्या पत्नी प्रज्ञा सुर्यकांत सुरवसे वय ४२ रा. भीमनगर नळदुर्ग हल्ली मुक्काम पनवेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात मुख्य आरोपी सोहन जयकुमार गायकवाड वय २१ व जयकुमार गायकवाड या बाप – लेका विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी सोहन गायकवाड याला पोलिसांनी अटक केली असुन दुसरा आरोपी जयकुमार गायकवाड

        एका किरकोळ कारणावरून तरुणाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्त्या होण्याची नळदुर्ग शहरातील अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असुन एक किरकोळ वादाची घटना किती भयंकर ठरू शकते हे या घटनेवरून लक्षात येते. सुर्यकांत उर्फ पपू सुरवसे यांच्या पत्नी प्रज्ञा सुर्यकांत सुरवसे यांनी आक्रोश केला माझ्या पतीला आरोपीने विनाकारण निर्घुण हत्या केली आसुन त्यांना फाशीच झाली पाहिजे म्हणून हंबरडा फोडला

Related Articles

ताज्या बातम्या