spot_img
spot_img
spot_img

डिजिटल मीडियाचे प्रेदेश अध्यक्ष सिध्दार्थ भोकरे याना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात ईमाचा नळदुर्ग येथे जाहीर निषेध : आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई सलग्न डिजिटल मेडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा दै.जनप्रवास चे संपादक सिद्धार्थ संजय भोकरे याना निनावी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका शाखा तुळजापूरच्या वतिने जाहीर निषेध करण्यात आला.

या संदर्भात नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि ईश्वर नांगरे पाटील याना पत्रकार संघाच्या वातीने देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हाटले आहे की डिजिटल मीडीयाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यानी ऑपरेशन सिंदूर बाबत लिहीलेल्या लेखामध्ये भारतीय आभिनेत्यानी पाकिस्तानच्या विरुध्द उभे राहून भारतदेशाचा गौरव करून देशाबद्यलचा आभिमान व्यक्त करावा असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. त्या लेखाचा संदर्भ देत अज्ञात व्यक्तीनी आभिनेते खान बंधूची माफी मागावी अन्यथा जिवंत ठार मारण्यात येईल अशी धमकी निनावी पत्राद्वारे दिली असून सदर प्रकार हा आभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा असून निंदनिय आहे. या घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालूकाशाखा तुळजापूर च्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून संबंधित आरोपीचा शोध घेवून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

नळदुर्ग पोलीस ठाण्याचे रूपानि याना देण्यात आलेल्या निवेदनावर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य अरुण लोखंडे, डिजिटल मिडिया चे जिल्हा सरचिटणीस एस. के. गायकवाड,पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विजय पिसे, संजय पिसे, ईरफान काजी, किशोर धुमाळ सह पत्रकारांच्या सह्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या