spot_img
spot_img
spot_img

सोपान गायकवाड म्हणजे कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व होते : अविनाश मडिखांबे

 

वागदरी ( एस. के गायकवाड ):

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे सोलापूर जिल्हा सचिव तथा काजी कणबसचे माजी उपसरपंच सोपान गायकवाड हे एक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याना प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व होते. त्यानी नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वा खाली रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सातत्याने उपेक्षितांच्या मानवी हक्कासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी जिवनाच्या अखेर पर्यंत संघर्ष केला असून आज रिपब्लिकन चळवळीत त्यांची प्रकर्षाने उणिव भासते आहे.अशा भावपूर्ण शब्दात रिपाइं (आठवले) चे अक्कलकोट तालुका अध्यक्ष आविनाश मडिखांबे यानी काजीकणबस येथे आयोजित कार्यक्रमात आदरांजली वाहिली.

काजीकणबस ता.अक्कलकोट येथे रिपाइं (आठवले ) चे सोलापूर जिल्हा सचिव तथा काजीकणबस चे माजी उपसरपंच दिवंगत सोपान यशवंत गायकवाड यांच्या प्रथम स्मृतिदीना निमित्ताने रिपाइं सह गायकवाड परिवाराच्या वतीने आदरांजलीपर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मडिखांबे बोलत होते.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुध्द महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कालकथित सोपान गायकवाड यांच्या प्रतिमांचे पूजन करून आभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी उपसरपंच दत्ता मुणाळे,पोलीस पाटील दिपक मंठाळे, रिपाइंचे धाराशिव जिल्हा युवा कार्याध्यक्ष तथा पत्रकार अरुण लोखंडे (जळकोट ता.तुळजापर) आदींची ही आदरांजलीपर भाषणे झाली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिआरपी चे नेते पँथर रत्नाकर गायकवाड यानी केले तर सुत्रसंचलन रिपाइंचे धाराशिव जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यानी केले.यावेळी डॉ. आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडिअम स्कूल नळदुर्गचे संस्थापक तथा रिपाइंचे नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे, दलित पँथरचे धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख तथा पत्रकार शामकांत नागीले रिपाइंचे जळकोट शाखा अध्यक्ष आरविंद लोखंडे, रिपाइंचे भैया इंगळे, विनायक गायकवाड,अविनाश गायकवार,किसन खारवे,मल्हारी वाघमारे,हरिष गायकवाड,जयहिंद गायकवाड, लखन कांबळे, नवनाथ कांबळे, दिपक गायकवाड,राजकुमार गायकवाड,धाराशिव कृषी विकास कंपणी चे संस्थापक

सौ.शिक्षाबाई जेटीथोर,रमेश जेटीथोर,सह महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या