स्वच्छता दिवाबत्ती पाणी पुरवठा लवकर दया अन्यथा नगर परिषदेला कुलुप ठोकु प्रशासनला त्रस्त नागरीकांचे खडेबोल
नळदुर्ग .(दादासाहेब बनसोडे )
नळदुर्ग येथे नळदुर्ग शहरातील स्वच्छता आणि डुकरांचा हौदोस पंधरा दिवसाच्या नंतर ही वेळेवर न मिळणारे पाणी यासंदर्भात नळदुर्ग येथील मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अभियंता यांचे लक्षच नाही यांच्या निषेधार्थ नळदुर्ग शहरातून गाढवाच्या गळ्यात मुख्याधिकारी या नावाची पाटी अडकवून शहरातून लॉन्ग मार्च करत नगरपालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा किल्ला गेट , क्रांती चौक , मुख्य ऐतिहासिक चावडी चौक भवानी चौक , शास्त्री चौक , लोकमाता अहिल्यामाई होळकर चौक ते नगर परिषदे पर्यंत दोन गाढवाच्या गळ्यात चक्क मुख्याधिकारी यांच्या नावाची पाठी आडकावून हा मोर्चा काढण्यात आला . यावेळी यावरती अनेकांची भाषणे झाली नगर परिषद मुख्याधिकारी सह कर्मचारी सुद्धा कामे टोलवा टोलवी करण्याच्या प्रयत्न करतात
या मध्ये शहरात होणारा पाणी पुरवठा वेळेवर न होणे शिवाय १५ दिवसा नंतर पाणी पुरवठा न करणे स्वच्छता अभियान सुरू करण्यासाठी ठिगारा मानसे रजिस्टरला नोंद करणे आणि १० ते १५ नागरीकाना काम देणे बाकीचे हडप करणे , शहरात डुकरानी हौदोस घातला आहे त्याचा त्रास सहन करणे कोणत्याही क्षणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही शहरातील कचरा व्यवस्थापन समिती मार्फत लाखो रुपये उचलून मात्र कचरा १० दिवस त्याच ठिकाणी ठेवणे आठ आठ दिवस घंटा गाडी न येणे शहरात अनेक ठीकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्या कडे जानीव पूर्वक दुर्लक्ष करणे जिथे वस्ती नाही तिथे रोड चे काम करणे व गुत्तेदाराची पोळी भाजून घेण्यासाठी मोजक्याच दलाला कामासाठी निवीदा काढणे व त्यांनांच देणे हा नगर परिषदेचा धंदा झाला आशा परखड शब्दात शहरातील अनेक दिग्गजानी आपले मते व्यक्त केली . शहरातील विविध समस्यांवर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याला धारेवर धरले होते अनेक प्रश्नाचा उलगडा झाला मुद्दाम मुख्याधिकारी इतर ठिकाणी पळ काढल्याचा संशय व्यक्त केला .
या मोर्चा मध्ये शहरातील विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नळदुर्ग नगर पालिकेवर मोर्चा काढताना नगर परिषदेच्या नावाने बोंब मारून त्याची सुरुवात करण्यात आली माजी नगराध्यक्ष शहबाज काझी माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण माजी उप नगराध्यक्ष मुन्ना शेख, सामाजिक कार्यकर्ते अजहर जहागीरदार, व्यापारी मंडळाचे मुकुंद नाईक, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले, शिवसेना उबाठाचे शहर प्रमुख संतोष पुदाले, उबाठाचे सरदारसिंग ठाकूर, मनसेचे नेते ज्योतिबा येडगे, प्रमोद कुलकर्णी, लहुजी शक्ती सेनेच शिवाजी गायकवाड, सलीम शेख, सामाजिक कायकर्ते आमेर शेख, गणेश मोर्डे, विजय ठाकूर, नवल जाधव, सतीश जाधव, नेताजी महाबोले, शाम कणकधर, रणजित डुकरे ,सुभाष कोरे, संतोष मुळे, सनी भूमकर धनराज मुळे माजी नगरसेवक सुधिर हजारे , सुनिल गव्हाणे , बबन चौधरी , आखलाख शेख , सलीम आयुब शेख , फातीमा कुरेशी , रहेमान कुरेशी , खाजा शेख
इम्रान पठाण , आबेदिन कुरेशी , निजाम शेख , मगबुल बिल्डर , आखीब मौजन , नजीर बागवान , काजेम बागवान , रब्बानी दस्तगीर शेख विजय जाधव विशाल डुकरे सह नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते