spot_img
spot_img
spot_img

प्रा.शा.संभाजीनगर जळकोट शाळेत प्रवेशोत्सव सोहळा विविध उपक्रमानी साजरा 

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर जळकोट येथे शैक्षणिक वर्ष 2025 -26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात व प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात व थाटामाटात घेण्यात आला. इयत्ता पहिली मध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत सजवलेल्या गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. तसेच सोबत घोषणा देत भव्य प्रवेशदिंडी शाळेच्या वतीने काढण्यात आली. त्यानंतर शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना टोपी, पुष्पगुच्छ देऊन नवागतांचे स्वागत मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच शासनाच्या धोरणानुसार पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गणेश वाटप करण्यात आले. पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत असताना पहिले पाऊल म्हणून त्यांच्या पायाचा ठसा घेण्यात आला. पहिलीचा वर्ग व शाळेचा परिसर रांगोळ्यांनी, तोरणांनी आकर्षकपणे सजवण्यात आला होता. सर्व विद्यार्थ्यांच्या टाळ्याच्या गजरात पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय परिसराची ओळख करुन देऊन वर्गात पाठवण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, उपाध्यक्ष शकील मुलानी अमोल माने हे उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महानंदा महामुनी (मुख्याध्यापक), महादेवी रेणुके, निळकंठ इटकरी,सत्यवान अभिवंत, दिनकर वनवे, गजानन मुरमुरे, मोहनदास चव्हाण, धनराज कुडकले, महादेव आहेरकर व श्रीकांत कदम यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे निवेदन धनराज कुडकले यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या