आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर : विजय पिसे जळकोट
सोलापूर येथील अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समितीकडून सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक सहा मध्ये शैक्षणिक साहित्य वह्याचे वाटप व ग्रंथ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आले.क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले प्रतिमेचे मान्यवराच्या हस्ते पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समितीचे अध्यक्ष अशोक खानापुरे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कथामाल्याच्या कार्याविषयी व श्यामची आई पुस्तकाचे महत्व सांगितले. उपाध्यक्षा आरती काळे गुरु शिष्यावर आधारित एक सुंदर कथा कथाकथनातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. राष्ट्रीय प्रमुख कार्यवाह सुनील पुजारी समूहगीत सादर करून विद्यार्थ्यांचे मने जिंकले. सोलापूरचे दानशूर व्यक्ती निवृत्ती गायकवाड (स्व:कुळसाळी) यांच्या सौजन्याने प्राप्त झालेल्या वह्याचे वाटप करण्यात आले. आरती काळे व अशोक खानापुरे यांच्या हस्ते शाळेला दहा ग्रंथांचे वाटप करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका आश्विनी लांबतुरे यांनी केले या कार्यक्रमासाठी कथामालेचे कोषाध्यक्ष प्रा. अशोक म्हमाणे , दत्तात्रय गायकवाड, वृत्तपत्र मंचाचे नूतन अध्यक्ष फैय्याज शेख, शेळगीचे जनसेवक शिवलिंग शहाबादे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.