spot_img
spot_img
spot_img

सह्याद्रि इन्फ्राटेक कंपांनीचे मालक दिग्गज देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करा :- दलित पॅंथर तर्फे पोलिस अधिक्षक धाराशीव यांना निवेदन

नंदगाव (शाम नागिले) धाराशीव जिल्हातील सह्याद्रि इन्फ्राटेक कंपांनीचे मालक दिग्गज दिपक देशमुख यांच्यावर कामगाराची पिळवणूक व फसवणूक केल्या बद्दल गुन्हा दाखल करा असे निवेदन मा पोलिस अधिक्षक धाराशीव यांना दलित पॅंथर चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बंडू गवळी यांनी दिले आहे .

या बाबत सविस्तर व्रत असे की , सह्याद्रि इन्फ्राटेक कंपांनीचे मालक दिग्गज दिपक देशमुख हे कर्नाटक राज्यातील रायचूर या शहरामध्ये 13 किलो मीटर गॅस पाईपलाईन चे काम केले असून या कामासाठी दोन ट्रॅक्टर ,प्ल्म्बर , मजूर असे 30 ते 40 कामगारा कडून काम करून घेतले , परंतु त्यांचा 8 महिन्या पासून पेमेंट न दिल्याने त्या कामगारावर उपासमाराची वेळ आली असून या कामगारावर अन्याय करणार्‍या कॉन्ट्रॅक्टर च्या विरोधात कामगारांनी दलित पॅंथर कडे तक्रार केली असतांना दलित पॅंथर चे सोलापूर जिल्हाअध्यक्ष बंडू गवळी यांनी दिग्गज देशमुख यांना कॉल केला असतांना त्यां कामगारांना ओळखत नाही ,माझा काहीही संबंध नाही अशी उडवा उडवीची भाषा करून फोन कट केला . हा इसम शासकीय कामात व लोकांना व अनेक मजुरांची ,कामगारांची फसवणूक केलेली आहे तरी याची सखोल सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी आणि त्या 40 मजुरांचा पेमेंट करण्यात यावा अन्यथा दलित पॅंथर संघटनेला कठोर पाऊले उचलावी लागतील असे निवेदन दलित पॅंथर चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बंडू गवळी यांनी पोलिस अधिक्षक धाराशीव यांना दिली आहे .

Related Articles

ताज्या बातम्या