ईटकळ प्रतिनिधी: तुळजापूर तालुक्यातील इटकळ गावात आज सकाळी एक गंभीर घटना घडली. स्थानिक दूध डेअरीची भिंत अचानक कोसळल्याने एक तरुण जागीच ठार झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृत बबन उर्फ रोहित हजारे (राहणार अणदूर) या तरुणाच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी प्रशासन दाखल झाले असून तपास सुरू आहे..