जळकोट (अरुण लोखंडे ) आपल्या भारत देशामध्ये प्राचीन बुध्द काळापासून रुषीमुनी ते साधू संत मंहत यांच्या पासुन चालत आलेली योग आणि ध्यान साधना हा शारीरीक व्यायमाचा प्रकार आहे . आपल्या सरकारने प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालये आदी ठिकाणी २१ जुन हा जागतिक योगा दिन म्हणुन साजरा करण्याचा संकल्प केला आहे .
त्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमनगर येथे योगा दिना निमीत्त शालेय विद्यार्थी व अंगणवाडी तील लहान बालके यांनी शाळेच्या प्रागणात योगा दिन साजरा केला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी माळी यांनी विद्यार्थ्यांना योगा कसा करावयाचा याबाबत माहीती दिली आणि त्यांचे त्यांनी प्रत्याशिक करून दाखविले दररोज योगा केल्याने व ध्यानसाधना केल्याने माणसाचे आरोग्य चागले राहाते मन मेंदूआणि मनगट सक्षम राहाते त्या मुळे माणसांच्या मना मध्ये नकारात्मक विचार येते नाही नेहमी सकारात्मक विचार येत असतात अगदी बुद्ध काळा पासून ही योगा पद्धत चालू होती आणि आज ही संपूर्ण जगामध्ये योगा पध्दत चालू आहे आज घडीला सुद्धा भारतातील तर नव्हे तर जगातील आश्रम गुरुकुल बौध्द विहारात सांधू संत बौद्द भिक्षू नित्य नियमाने सकाळच्या प्रहारी योगा आणि ध्यान करतात म्हणुन ते नेहमी प्रसन्न दिसतात आणि आपल्या मध्ये चांगल्या विचाराची पेरणी करतात आणि ही पंरपरा टिकवली पाहिजे मत सरानी व्यक्त केले . यावेळी आशा सेविका मनिषा गायकवाड यांनी पोषण आहार आणि स्वच्छता याबाबतचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले . गावातील जिल्हा परिषद प्रशाला मुलाची मुलीची शाळा याही ठिकाणी हा दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या सह शिक्षीका पवार मॅडम अंगणवाडी सेविका कोमल माने नेहा लोखंडे उमेदच्या सी आर पी ज्योती लोखंडे सर्व शाळेचे शिक्षक मुख्याधापक सह शालेय विद्यार्थी विध्यार्थीनी उपस्थित होते .