वाढदिवसाचा इतर खर्च न करता वृक्षारोपण करून समाजात आदर्श निर्माण केला
नळदुर्ग ; दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथील प्रतिष्ठीत नागरिक सेवा निवृत्त केंद्र प्रमुख गुरुनाथ खंडाप्पा मुळे व त्यांच्या गृहणी सरोजनीताई गुरुनाथ मुळे यांच्या अमृत महोत्सवा निमित्त ७५ वी अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता, या बरोबर वृक्ष लागवड त्याचे संगोपण ही आजच्या काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन ऐतिहासिक शहरात मरीआई मैदान , बुद्धनगर , मुळे नगर [ प्लॉटिंग ] आदि ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ७५ वृक्ष लागवड करण्यात आले वाढदिवसाचा इतर खर्च न करता समाजा समोर एक आदर्श निर्माण केला आहे
हे वृक्ष लागवडीचा हंगाम म्हणजे ऑक्सीजन देणे झाडाची घेणे त्या मधुन आर्युवेद औषध करणे अनेक विकाराना झाडपाला हा पोषक आसतो आणि फायदेशीर ठरतो आहे हे लक्षात घेऊन वृक्षाची वाढ करणे व त्याचे संगोपण करणे हा ध्यास धरून मुळे परिवारानी वृक्ष संगोपणाची जबाबदारी स्विकारली आहे .
यावेळी नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक संजय बताले , नळदुर्ग सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय कोरे ,सेवानिवृत शिक्षक शिवाजीराव वऱ्हाडे , सुभाष महाबोले , गव्हाणे गुरुजी , कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते मल्लीनाथ माळगे , सुभाष कोरे डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्य प्रवर्तक मारुती खारवे शिवाजीराव मिटकर गुरुजी चनबस भ्रमणप्पा बिराजदार पत्रकार दादासाहेब बनसोडे ,विनोद चौगुले , अनिल शेळके , विजयकुमार शेळके , सुभाष डिग्गे , गुरुलिंग सिद्धमल्ले , दात्तात्रय मुळे ,अफसर जाहागीरदार , उध्वस सुरवसे , दयानंद स्वामी , प्रकाश स्वामी , खंडेशा कोरे , एकनाथ सिरगुरे , आलगुडे , काशीनाथ कलशेट्टी , कुंभार , सिद्धराम मुळे , राजकुमार विभुते , बाबुराव धुम्मा , मेजर खानमाडे , गिरमल गायकवाड तानाजी जाधव संगमेश्वर व्हनाळे , दिनेश कोरे , विजयकुमार यादगीरे ,आदीच्या प्रमुख उपस्थितीत हा वृक्षा रोपण व सेवानिवृत्त केंद्र प्रमुख गुरुनाथ खंडाप्पा मुळे व पत्नी सरोजनीताई गुरुनाथ मुळे यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमिला शरणाप्पा चटगे , प्रशांत गुरुनाथ मुळे , प्रविण गुरुनाथ मुळे , रेणुका प्रशांत मुळे , स्वाती प्रविण मुळे धनराज लक्ष्मण मुळे , गणेश बाबुराव मुळे , भाग्यश्री सुनिल मुळे , संतोष मुळे , संतोषी संतोष मुळे , कविता धनराज मुळे अदिनी परिश्रम घेतले .