spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग शहरातील अतिक्रमण धारकानो ए एच पी घरकूल योजनेत सहभागी व्हा आणि पक्के घर मिळवा :- मुख्याधिकरी लक्ष्मण कुंभार 

 

———————————————- अतिक्रमण धारकांसाठी शासनाची खास घरकुल आवास योजना 

———————————————-

नळदुर्ग दादासाहेब बनसोडे

 

नळदुर्ग शहरातील सर्व अतिक्रमण धारकांनी नळदुर्ग नगरपरिषद मध्ये शासनाने अतिक्रमण धारकांसाठी खास योजना सुरू केली आहे ती म्हणजे ए एच पी योजना या योजने अंतर्गत जे बेघर अतिक्रमण धारक आहेत ज्यांना आपल्या कुटुंबाचा उदार निर्वाह करण्यासाठी जागा नाही परंतू ते लाभार्थी अतिक्रमण करून राहातात आशा अतिक्रमण लाभार्थाना ए एच पी अंतर्गत घरकुल योजना राबविण्यात येणार आहे .

जे अतिक्रमण धारक आहेत अशा लाभार्थ्यांना ही योजना परवडणारी असून नळदुर्ग शहरातील अतिक्रमण धारकांनी या ए एच पी योजने अंतर्गत घरकुल योजना मिळण्यास पात्र राहाणार आहेत आशा

लाभार्थ्यांनी नगर परिषदेत तात्काळ आपली नोंदणी करावी आणि खालील कागदपत्राची पूर्तता करावी १ ) तहसीलचे रहिवासी २ ) तहसिलचे उत्पन्न ३ ) शिधापत्रिका ४ ) बँक पासबुक ५ ) कुटुंबाचे आधार कार्ड वरिल कागदपत्र नगर अभियंता समीर मोकाशी यांच्याकडे सादर करावेत असे आव्हान नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार व अभियंता समीर मोकाशी यांनी केले आहे .

नळदुर्ग शहरामध्ये ए एच पी योजना राज्यात ३० x ४० वर्ग मीटर अंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे शासनाच्या योजने अंतर्गत जितका निधी या योजनेला मिळणार आहे त्या योजने मध्ये लाभार्थ्यांनी उर्वरित लोकवाटा लाभार्थानी भरणे बंधनकारक आहे या लाभार्थांना त्यांच्या हक्काचे व पक्के घर मिळण्यासाठी मदत होईल .

आज नळदुर्ग शहरातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात गोरगरीब कोणी पत्र्याचे शेड व दगड मातीचे कच्चे घर करून आपल्या कुटुबांच्या पोटाची खळगी भरतात आणि त्या पैशा मधून नळदुर्ग सारख्या शहरात जागा विकत घेऊन बांधकाम करणे परवडणारे नसून जे गरीब आहेत आणि अतिक्रमण करून राहातात आशा लाभार्थांना शासनाने ए एच पी या नावाने योजना चालू केली आहे या योजनेचा शहरातील सर्व अतिक्रमण धारक लाभार्थांनी तात्काळ लाभ घ्यावा आणि आपल्या हक्काचे व पक्के घर मिळवा आसे आवहान नगर परिषदे चे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी केले आहे . नळदुर्ग दुर्गा नगर येथे किंवा शहरात ज्याना तुळजापूर तहसीलचे जाग्याचा कबाला आसल्याचे प्रमाणपत्र आहे आशा लाभार्थ्यांना त्यांना बि एल सी अंतर्गत प्रत्येक लाथार्थाना घरकुल आवास योजनेचा सहजा सहजी लाभ मिळू शकतो .

जो अतिक्रमण धारक अतिक्रमण करू राहतो त्यांनी तात्काळ ए एच पी योजनेचा नगर परिषदेचे अभियंता समीर मोकाशी यांच्या कडे वारील कागजपत्र देऊन फॉर्म भरावा आणि आपल्या हक्काचे व पक्के घर मिळवावे असे आव्हान नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार आणि अभियंता समीर मोकाशी यांनी केले आहे

Related Articles

ताज्या बातम्या