जळकोट (अरुण लोखंडे) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे संकल्प ते सिद्धी या आभियाना अंतर्गत तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्ग दर्शना खाली गणेश सोनटक्के यांच्या संपर्क कार्यालया समोर आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचा जनता दरबार संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय जनता पार्टीचे नेते तथा धाराशिव जिल्हा मजुर फेडरेशनचे अध्यक्ष सतिशनाना दंडनाईक यांचा गणेश सोनटक्के यांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे दिपक आलूरे,साहेबराव घुगे,रंजना राठोड,विलास राठोड याचांही सत्कार करण्यात आला.या प्रसंगी जळकोट,मुर्टा,होर्टी, चिकुंद्रा,मानमोडी,जळकोटवाडी, हंगरगा (नळ ),बोरमन तांडा, गणेशनगर तांडा,आलियाबाद तांडा आदी वाडी वस्ती गावातील जेष्ठ नागरीक महिला उपस्थित होते,जनता दरबारामध्ये जास्त करून जेष्ठ नागरीकांच्या पगारीविषयी व शिधापत्रीका असुनही धान्य मिळत नाही, शेतकऱ्याच्या पगारी आदी विषय जास्त चर्चीले गेले प्रत्येक नागरीक व महिला ह्या आमच्या गेल्या सहा सात महिन्या पासुन पगारी बंद आहेत हाच सुर जनता दरबारामध्ये प्रामुख्याने दिसून येत होता.घरकुलाचा विषय होता त्यामध्ये एक हप्ता मिळाला तर दुसरा हप्ता वेळेत मिळत नसल्याने घर उघड्यावर असल्याचे काही लाभ धारकांनी विषय मांडला.या जनता दरबारासाठी आलेल्या सर्व नागरीकांच्या सर्व समस्या ऐकून घेऊन त्याची कागदपत्रे घेण्यात आले व संबधीत विभागाशी सदर प्रश्नी संपर्क करून व त्या त्या विभागाचे एकदिवशीय मेळावे लावून ह्या सर्व प्रश्नांची योग्य ती कार्यवाही करून आपल्या सर्व समस्या सोडविण्यात येथील असे या जनता दरबारात नागरीकांना सांगण्यात आले सदर दरबारात आलेल्या सर्व नागरीकांसाठी अल्पउपहार व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या जनता दरबारास नागरीकांचा प्रतिसाद चांगला मिळला व सर्वाच्या प्रश्नाचे निराकारण करण्यात आले यावेळी माजी सरपंच तम्माणाप्पा माळगे, बाळासाहेब पाटील,नागनाथ किलजे,ईराणा स्वन्ने,कस्तुरा कारभारी,इलाही गडीवाले,दामु लोखंडे आदीसह परिसरातील कार्यकर्ते मोठया संख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजर समितीचे चेरमन ॲन्ड अशिष सोनटक्के यांनी केले.तर सुत्रसंचलन अरुण लोखंडे यानी केले व आभार विलास राठोड यांनी मानले