spot_img
spot_img
spot_img

इस्कॉन सोलापूर तर्फे 2 जुलै 2025 रोजी भव्य जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट 

सोलापूर येथील अक्कलकोट रोड स्थित व्रजधाम श्री श्री राधा दामोदर मंदिर (इस्कॉन) सोलापूर तर्फे, दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार दिनांक 2 जुलै 2025 रोजी भव्य जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भव्य जगन्नाथ रथयात्रेकरिता इस्कॉन संस्थापक आचार्य श्री भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे शिष्य, इस्कॉन पदयात्रा प्रमुख, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा‌द्वारे जीवनगौरव सन्मानाने पुरस्कृत, विश्वविख्यात कीर्तन सम्राट त्रिदंडी संन्यासी परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज, दक्षिण आफ्रिकेचे परम पूज्य राम गोविंद स्वामी महाराज, अमेरीकेचे परम पूज्य श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज आणि यासोबतच महाराष्ट्रातील विविध भागातून सु‌द्धा अनेक वरिष्ठ भक्तांची मांदियाळी सोलापूर येथे येणार आहे.

पूर्वी जगन्नाय रथयात्रा फक्त जगन्नाथ पुरी पर्यंतच सीमित होती परंतु भारतातील जगविख्यात संत, इस्कॉनचे संस्थापक आचार्य भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या असीम कृपेने तीच जगन्नाथ रथयात्रा जगातल्या १६० हून अधिक देशांमध्ये काढल्या जात आहेत.

या संपूर्ण सृष्टीचे स्वामी भगवान जगन्नाथ हे बलदेव व सुभद्रा महाराणी समवेत सार्वजनिक स्वरूपामध्ये, आपल्या स्थावर आरूढ होऊन शहरातील रस्त्यांवर संपूर्ण प्राणीमात्रांना दर्शन देण्यासाठी येतात.

ब्रम्हांडपुराणात सांगितले आहे की, जी व्यक्ती भगवान जगन्नाथांच्या रथयात्रा उत्सवाचे दर्शन करतो, रथावर आरुढ भगवंतांच्या स्वागतासाठी आदरपूर्वक उभा राहतो, जगन्नाथ भगवंतांच्या रथाची दोरी ओढतो, रथासोबत काही पावले चालतो त्याची सर्व दुःखे व पाप नष्ट होऊन जातात आणि त्याच्या जीवन समाप्तीनंतर त्याला वैकुंठ लोकांची प्राप्ती होते.

भगवान जगन्नाथ रथयात्रेचे उद्‌घाटन बुधवार दिनांक 2 जुलै 2025 दुपारी 1.00 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथून होईल त्यानंतर चार हुतात्मा, सरस्वती चौक, मेकॅनिक चौक, पांजरापोळ चौक, BSNL टेलिफोन भवन, चाटी गल्ली, सराफ बाजार, मधला मारुती, कौंतम चौक, कन्ना चौक, राजेंद्र चौक, जोड बसवण्णा चौक, भद्रावती पेठ, मार्कडेय रुग्णालय, दत्तनगर, दाजी पेठ यानंतर श्री वेंकटेश्वर मंदिर मंगल कार्यालय येथे समापन आणि सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे.

जगन्नाथ रथयात्रेच्या उ‌द्घाटनासाठी आणि प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. जयकुमार गोरे साहेब पालक मंत्री जिल्हा सोलापूर, खासदार, माननीय प्रणिती ताई शिंदे, माननीय जिल्हाधिकारी श्री, कुमार आशीर्वाद, माननीय पोलीस आयुक्त श्री एस. राजकुमार, माननीय आयुक्त सोलापूर महानगर पालिका श्री सचिन आंबासे, माननीय आमदार देवेंद्र कोठे, माननीय आमदार सुभाषराव देशमुख, माननीय आमदार विजयकुमार देशमुख, माननीय आमदार सचिन कल्याणशेट्टी हे उपस्थित राहणार आहेत.

रथयात्रेमध्ये वेगवेगळे अध्यात्मिक देखावे, भगवंतांचा मनमोहक शृंगार, सर्व भक्तां‌द्वारे भगवान्नामाचा जयघोष, भगवंतांना 56 भोग नैवेद्य, महाआरती असे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत

या भव्य जगन्नाथ रथयात्रा महोत्सवासाठी संपूर्ण सोलापूरवासियांनी रथयात्रेमध्ये मोठ्यासंख्येने सहभागी होऊन श्री श्री जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा महाराणी यांची असीम कृपा प्राप्त करावी, असे आवाहन इस्कॉन सोलापूरचे अध्यक्ष श्रीमान कृष्णभक्त दास आणि जगन्नाथ रथयात्रा व्यवस्थापन समिती‌द्वारे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी: 9823920072/9326981533/9873778393

Related Articles

ताज्या बातम्या