spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा अजब कारभार 

—————————————–

प्रत्येक समं वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती देण्यास महाविद्यालय उदासीन ___________________________________

नळदुर्ग ( दादासाहेब बनसोडे )

 

नळदुर्ग येथे बालाघाट शिक्षण संस्था संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील संस्थेस माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या अनुषंगाने महाविद्यालयातील एकूण प्रवेशित संख्या किती यामध्ये एस्सी , एस टी , एस बी सी , ई एस सी आणि खुल्या समं प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या किती प्रत्येक समं प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाकडून किती फीस दिली जाते याची कॅटॅगिरी नुसार वर्ग निहाय माहिती मिळावी यासाठी शिवाय महाविद्यालयातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याकडून फीस वसुली केली जाते त्या वसुली केलेल्या पावत्याची मागणी रितसर माहितीच्या अधिकारात करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कॅटेगरी नुसार व वर्ग निहाय माहिती माळावी यासाठी दिनांक १७ / ०४ / २०२५ रोजी पत्रकार दादासाहेब दुष्यंत बनसोडे यांनी माहितीच्या अधिकार अधिनियम २००५ च्या नुसार माहिती मागितली होती परंतु आजतागायत बालाघाट शिक्षण संस्था संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग यांनी कसल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही माहिती देण्यासाठी महाविद्यालय उदासीन असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे महाविद्यालय माहिती देण्यास चक्क टाळाटाळ करत आहे .

महाविद्यालयातील एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या किती तेही कॅटॅगिरी नुसार मागणी केली होती महाविद्यालयाकडून माहिती देण्यास कोणताही प्रतिसाद मिळत असून आजतागायत माहिती देण्यात आलेली नाही म्हणून दिनांक २० / ०५ / २०२५ रोजी बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथील प्राचार्य यांच्याकडे माहितीच्या अधिकारांचा अपिलीय अर्ज दाखल केला आसुन आज त्या अपिलीय अर्जाला ४५ दिवस पुर्ण होतात तरीही महाविद्यालयाला माहितीच्या अधिकाराखाली मागण्यात आलेली माहिती देण्यास जाग आली नाही . झोपीच सोंग घेऊन झोपणाऱ्या महविद्यालयला जाग येत नाही का?

बालाघाट शिक्षण संस्था संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय माहिती देत नाही कारण ” कुठेतरी पाणी मुरतयं ” महाविद्यालयाचा आजब कारभार सुरू केला आहे ते म्हणजे विनाकारण विद्यार्थ्याकडून कोणत्या प्रकारची आणि कशाची फिस वसुली करत आहे हे संबंधित प्रशासनाने चौकशी करावी या बाबत धारशिव जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्या कडे मागाणी करणार आहे शिवाय माहितीचा अधिकार अधिनियम कायदा आणि सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी रितसर माहितीचा अधिकार ” क ” खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे मागाणी करणार आहोत आशा संस्थेवर दंडात्मक कारवाईची मागणी करण्यात येणार आहे . आणि संबंधित विषयाला अनुसरून शिष्यवृत्ती धारक विद्यार्थांकडून कशाची फिस वसुली सुरू आहे यांची रितसर चौकशी करावी संबंधीतावर अनुसुचित जाती प्रतिबंध कायदया नुसार कारवाईची करण्याची मागणी वरिष्ठांकडे

करणार आहेत . आगर वरिष्ठाने या विषयाला अनुसरून दखल नाही घेतली तर बालाघाट शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालया समोर उपोषण करण्यात येणार असल्याचे पत्रकार दादासाहेब दुष्यंत बनसोडे यांनी सांगितले आहे .

Related Articles

ताज्या बातम्या