आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर :-विजय पिसे जळकोट
जळकोट येथील श्री कुलस्वामिनी प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जळकोट, तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे दिनांक 6 जुलै 2025 रोजी येथील आश्रम शाळेत आषाढी एकादशीनिमित्त, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, कॉलेजचे प्राचार्य माननीय संतोषजी चव्हाण साहेब होते, यावेळी श्री कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय आशा पवार मॅडम श्री कुलस्वामिनी माध्यमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक नागेंद्र गुरव सर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक श्री देवानंद पांढरे सर, संतोष दूधभाते सर, श्रीमती शांताबाई चौगुले मॅडम कार्यक्रम सुरळीत करण्यासाठी भूमिका बजावली, शाळेच्या प्रणांगणात, गोल रिंगण करून अभंग गाण्यात आले, यावेळी प्राचार्य संतोष चव्हाण साहेब यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व आणि दर्शवत असलेल्या सांस्कृतिक वारशावर भर देत बाल वारकरी मेळाव्याला संबोधित केले. “हा उत्सव केवळ एक धार्मिक पाळत नाही तर एकता आणि सांस्कृतिक अभिमान वाढवून, एक समुदाय म्हणून एकत्र येण्याची संधी आहे,” पंढरपूरचे विशेष महत्त्व, वारीचे चे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या आनंद सोहळ्याचा भाग झाल्याबद्दल धन्यवाद. स्वागत आहे, आणि भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुख, समृद्धी आणि शांतीने भरून जावो.
*तूझा रे आधार आम्हाला। तूच रे पाठिराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।।* *चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।*
या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले. “अशा अर्थपूर्ण परंपरेचा भाग बनणे हा एक सुंदर अनुभव आहे. आपण केवळ आपल्या संस्कृतीबद्दलच शिकत नाही तर आपलेपणा आणि अभिमानाची भावना देखील अनुभवतो,” असे दिंडी मिरवणुकीत सहभागी झाले
टाळ मृदुंग वाजवण्यासाठी भजनी मंडळ, चिमुकले बाल विद्यार्थी, यांनी गजराचा स्वाद घेतला, जळकोट गावचे वारकरी, व भजनी मंडळ लक्ष्मण पांचाळ, श्रीमती सरुबाई कदम,कलावती भोसले यांच्यासोबत आदी शाळकरी चिमुकले मुलं वारकरी मंडळ उपस्थितीत होते. या पालखीचा सोहळा शाळेतून वाजत गाजत जळकोट येथील श्रीराम नगर ,माऊली मार्ट,बस स्टँड वरुन विठ्ठल मंदिरात दाखल झाला. त्या ठिकाणी अभंग करण्यात आले. नंतर पालखी सोहळा शाळेत आल्यानंतर प्रसाद म्हणून साबुदाण्याची खिचडी वाटप करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री खंडेराव कारले, श्री अभिजीत चव्हाण,श्री किरण ढोले, अप्पासाहेब साबळे, श्री बिळेणसिध्द हक्के, श्री किरण कांबळे, श्री बाळासाहेब मुखम, श्री दुर्गेश कदम,श्री अमितसिंग खारे श्री बालाजी राठोड ,श्री सागर चव्हाण, शंकरराव चव्हाण श्रीमती ज्योतीताई राठोड ,श्रीमती प्रमिला कुंचगे, श्रीमती मिराबाई पवार श्रीमती कल्पना लवंद ,श्रीमती अश्विनी लबडे,श्रीमती सोनाली चव्हाण, कुमारी मयुरी कांबळे शिक्षक वृंद आणि चतुर्थ कर्मचारी किसन पाचांळ,बालाजी अहंकारे ,सुग्रीव देवकते,सिद्राम बनसोडे यांचे सहकार्य लाभले.