वागदरी (एस.के. गायकवाड):
ग्रामदैवत श्री संत सदगुरु भवानसिंग महाराज यांच्यामुळे वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या वागदरी ता. तुळजापूर येथिल जि.प.प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यानी आषाढी एकादशी निमित्ताने टाळ मृदंगाच्या गजरात काढली वारकरी दिंडी.यामुळे गावातील वातावरण भक्तीमय झाले होते.
प्रारंभी शिक्षण प्रेमी नागरीक तथा भाजपाने तालुका उपप्रमुख किशोर सुरवसे,भाजपा मिडीयासेल चे किशोर धुमाळ, रिपाइं (आठवले)चे एस.के. गायकवाड, पालक सचिन पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक तानाजी लोहार यांच्या मार्गदर्शना खाली येथील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने शाळेच्या प्रांगणात वारकरी दिंडीच्या वेशभुषे गोल रिंगण करून पंढरीच्या विठ्ठलास आभिवादन करून विठ्ठल..ss विठ्ठल..sss जय हरी विठ्ठल.. रामकृष्ण हरी.. sss असा जयघोष करित जि.प. शाळा ते मुख्य रस्यावरून
श्री संत भवानसिंग महाराज मंदीरापर्यंत टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी दिंडी काढली.यामुळे गावतील वातावरण अत्यंत भक्तीमय झाले होते.जागो जागी या शालेय वारकरी दिंडीचे गावातील भावीक भक्ताकडून श्रध्दायूक्त भावनेने स्वागत केले जात होते. शेवटी येथील श्री संत भवानसिंग महाराज मंदीराच्या प्रागणात या दिंडीची सांगता करून प्रत्येकानी संत भवानसिंग महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात प्रतिपंढरपूर दिसून येत होते. या प्रसंगी सहशिक्षिका रेखा साखरे, संपदा माडजे,सहशिक्षक काळे सर सह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.