आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर :-विजय पिसे जळकोट
जळकोट येथील कृष्णा कोचिंग क्लासेस मध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री. विठ्ठल रुक्मिणी यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यात श्री. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पूजा करून हरी नामाच्या गजरात व संत ज्ञानेश्वर माऊली महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या जयघोषात पालखी घेऊन गावातून दिंडी काढण्यात आली. यावेळी बालकांनी तुळशवृंदावन, टाळ, विठ्ठल रुक्मणी यांची मूर्ती व पालखी घेऊन वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून सहभाग नोंदवला. तसेच विद्यार्थ्यांनी भक्ती गीतावर नृत्य सादर केले, पारंपरिक पद्धतीने फुगडी खेळली व रिंगण सोहळा करण्यात आला. यावेळी बाल कलाकारांना खाऊचे वाटप करून सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी *कृष्णा कोचिंग क्लासेस* चे संचालक श्री. मनोज लष्करे-पाटील, संचालक श्री. श्रीकांत कदम, संचालक श्री. सौदागर पवार व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.