वागदरी (एस.के.गायकवाड):
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याना कर्ज माफी देवून शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणार असे जाहीरनाम्या द्वारे अश्वासन देवून राज्याच्या सत्तेवर आलेले देवेंद्र फडणविस यांच्या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला दिसून येत असून आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्याना कर्ज माफी देऊ मग ती योग्य वेळ कधी येणार शेतकरी मेल्यावर..?असा खडा सवाल नळदुर्ग ता. तुळजापूर येथे शेतकरी संघर्ष समितीने रास्ता रोको आंदोलनात केला.
शेतकरी संघर्ष समितीचे नेते सरदारसिंग ठाकूर, दिलीप जोशी यांच्या प्रमुख नेतित्वाखाली नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्गावर बस स्थानकांच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात शेतकऱ्याना कर्ज माफी द्यावी, सन – २०२०-२०२१ चा पिक विमा वाटप करावा, उसाचे थकीत बिल द्यावे,शेतकऱ्यावर पोलीस बळाचा वापार करून अन्याय करणाऱ्या पोलीस कर्मचार्यावर कारवाई करावी, शेतकरी अनुदानाचे वाटप करावे आदीसह विविध जिव्हाळ्याच्या मागण्यासाठी दि.८ जुलै २o२५ रोजी सकाळी ठिक ११ वा.”कर्ज माफ़ी मिळालीचं पाहीजे”,”शेती आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची” असा घोषणा देत शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नळदुर्ग बसस्थानका समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना शेतकरी संघर्ष समितीचे नेते दिलीप जोशी यानी वरिल प्रश्र उपस्थित केला.
यावेळी सरदारसिंग ठाकूर,महादेव बिराजदार, श्रीमंत फडतरे आदिची ही भाषणे झाली.यावेळी नळदुर्ग येथील ग्राम महसुल अधिकारी संध्या कुलकर्णी यानी सदर मागण्याचे निवेदन स्विकारले.
या रास्तारोको आंदोलनात मानसिंग ठाकूर,गुलाब शिंदे, संतोष फडतरे, तोलू शेख,बंडू मोरे,काशिनाथ कळे,पंडित पाटील,गणपत सुरवसे,विरपक्ष माशाळकर,अशोक जमादार,हरिदास भोसले, अकाश देशमुख,राघू देशमुख,संतोष पाटील, राजेंद्र सुरवसे,प्रदिप सुरवसे,श्रीकांत पोतदार,शांतेश्वर पाटील,धन्नाप्पा पाटील, विजयकुमार पाटील, प्रतापसिंगठाकूर,अजमोदिन शेख सह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.






