वादरी (एस. के. गायकवाड ):
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तुळजापूर तालुक्याच्या वतीने दलित पॅंथर संघटनेचा ५३वा वर्धापन दिन तुळजापूर येथे दुपारी १२.०० वाजता डॉ.आंबेडकर चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करून तुळजापूर येथील सर्व जनतेस वर्धापन दिनानिमित्त मिठाईचे वाटप करून फटाकेची आतिषबाजी करित दलित पॅंथरचा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
सन १९७२ मध्ये पद्मश्री नामदेव ढसाळ, राजा भाऊ ढाले, प्रा. अरुण कांबळे, ज.वि. पवार, रामदास आठवले, भाई संगारे, गंगाधर गाडे, लतीप खाटीक आदी मात्तबर नेत्यांच्या नेतृत्वाखाली दलित पँथची चळवळ मागासवर्गीय दलित उपेक्षितावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरुद्ध न्यायासाठी सुरु झाली. नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली दलित पँथरच्या माध्यमातून उपेशितांच्या न्याय हक्कासाठी आणि मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ( छत्रपती संभाजी नगर ) नामांतरा करिता प्रदिर्घकाळ संघर्षात्मक लढा दिला गेला आणि आंबेडकरी आनुयायांची विद्यापीठ नामांतर ही अस्मीतेची छढाई जिंकली. हा पँथरचा प्रेरणादायी इतिहास पुढच्या पिढीकरिता माहिती असने गरजेचे आहे. हा उदात
हेतू समोर ठेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष तानाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, तुळजापूर तालुका अध्यक्ष प्रकाश कदम यांच्या नेतृत्वाखाली दलित पँथरचा वर्धापन दिन मोठ्या आनंदात व उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहराध्यक्ष अरुण कदम आप्पा कदम रवी वाघमारे विक्रांत चव्हाण निशांत कदम भास्कर पांडागळे धनराज वडवराव रवी कसबे जगन्नाथ लोहार अमोल वडवराव संतोष हावळे श्रीमंत पांडागळे भागवत कदम अरविंद सूर्यवंशी हनुमंत सोनवणे प्राध्यापक अशोक कांबळे शंकर पवार धर्मा भालेकर सुदाम कांबळे लखन पारधे बाबू सुरवसे किरण हावळे बापू हावळे तुळजाराम सावंत विक्रांत हावळे दाजी माने भोलेनाथ कदम हिरालाल सोनवणे शरणात कदम इत्यादी सह शेकडो कार्यक’र्ते उपस्थित होते.






