spot_img
spot_img
spot_img

रिपाइं तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी अरुण लोखंडे तर युवक तालुकाध्यक्ष पदी शुभम कदम यांची बिनविरोध निवड

नळदुर्ग येथे रिपाइंची जिल्हा बैठक संपन्न करण्यात आली .

नळदुर्ग दादासाहेब बनसोडे 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील व केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालिल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची तुळजापूर तालुकास्तरीय बैठक नळदुर्ग ता. तुळजापूर येथील एस.के.फंक्शन हॉल मध्ये अनंत्य खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली असून या बैठकीत रिपाइं (आठवले ) पक्षाच्या तुळजापूर तालुका अध्यक्ष पदी कार्यकर्ते अरुण नारायन लोखंडे यांची बिन विरोध निवड करण्यात आली.तर तुळजापूर शहर अध्यक्ष पदी वैजिनाथ पांडागळे, युवक तालुकाध्यक्ष पदी शुभम कमलचंद कदम यांची निवड करण्यात आली तसेच तालूका व जिल्हा कार्यकारणीच्या इतर पदाधिकारी ही निवडण्यात आले.

रिपाइं (आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश जाइंट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर धाराशिव जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली व रिपाइं मराठवाडा विभाग कार्यकारणी सदस्य दुर्वास बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, रणजीत बप्पा गायकवाड, जिल्हा सचिव एस. के. गायकवाड,बाबासाहेब मस्के, गुरुवर्य कैलास गवळी गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत (दि.१०) जुलै गुरुवार रोजी नळदुर्ग येथिल एस.के.फक्शंन हॉल येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची तालुकास्तरिय महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीत पक्षाची तालूका कार्यकारणीची निवड, अगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगर परिषदा आदी स्थानिक संख्येच्या सार्वत्रिक निवडनुका,पक्ष बांधणी, पक्षाची सदस्य नोंदणी सह विविध विषयावर चर्चा होऊन पक्षाच्या तालूका कार्यकारणीसह इतर पदाभिकारी यांची निवड करणात आली.

यावेळी रिपाइं (आठवले) तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, तालुका उपाध्यक्ष महादेव कांबळे, किशन पांडागळे, तालूका सचिव सुरेंद्र सुर्यवंशी, तालूका संघटक सुरेश लोंढे, तालुका संघटन सचिव दत्ता बरसोडे, तुळजापूर शहराध्यक्ष वैजिनाथ पांडागळे, नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे,युवा आघाडी तालुका अध्यक्ष शुभम कदम, तालुका उपाध्यक्ष अजय दुपारगुडे, युवा आघाडी तालुका सरचिटणीस प्रदिप सिरसाट, आदींची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश स्कुलचे मुख्य प्रवर्तक तथा संस्थापक मारुती खारवे यांनी केले .

तर धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के,जिल्हा संघटन सचिवपदी प्रताप कदम, जिल्हा कोषाध्यक्षपदी बाबुराव बनसोडे,जिल्हा सचिव एस. के. गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे आदींची निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी बैठकीला मार्गदर्शन करताना राजाभाऊ ओव्हाळ म्हणाले की रिपब्लिकन पक्ष हा डॉ.बाबासाहेब यांच्या संकल्पनेतील आणि केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील पक्ष असून कार्यकर्त्यानी पक्षासी एकनिष्ठ राहून प्रमाणिकपणे काम करावे. पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्या कार्यर्त्यांची गय केली जाणार नाही.अगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपूर्ण ताकतीनीसी लढण्याची तयारी ठेवा. असे आवहान ही शेवटी त्यानी केले.

तर जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे यानी नुतन पदाधिकारी यांचे आभिनंदन करून शुभेच्छा देवून आपण कार्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबिर पणे उभे राहणार असल्याचे सांगीतले.

याप्रसंगी रिपाइंचे नळदुर्ग शहर अध्यक्ष मारूती खारवे,देवानंद लोंढे,जमभीम वाघमारे, अंबादास डावरे,संभाजी डावरे, मधुकर डावरे, बाबा कदम, तानाजी उमाजी कदम,दिपक वाघमारे,दिगंबर वाघमारे, आरविंद लोखंडे,अशिष जाधव, बाबा कांबळे, किरण गायकवाड सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी गुरु पोर्णिमेचे औचित्य साधुन गुरुवर्य कैलास गवळी गुरुजी यांचा पक्षाच्या वतिने सत्कार करण्यात आला.

या बैठकीचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन एस.के.गायकवाड यानी केले.

Related Articles

ताज्या बातम्या