spot_img
spot_img
spot_img

रिपाइं (आठवले ) जिल्हा कार्याध्यक्ष पदी बाबासाहेब मस्के यांची निवड

वागदरी (प्रतिनिधी ):

जवळगा (मेसाई) ता.तुळजापूर येथिल पँथर चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते तथा रिपाब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे माजी तुळजापूर तालूका अध्यक्ष बाबासाहेब मस्के यांची रिपाइं (आठवले ) च्या धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

नळदुर्ग ता. तुळजापूर येते नुकतच रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश जाँइट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष विद्यनंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली.या बैठकीत रिपाइंचे जेष्ठ कार्यकर्ते ताथा माजी तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के यांची रिपाइं(आठवले)च्या धाराशिव जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून निवड प्रक्रियेचा भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश जाँइट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ, जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे, मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष आनंद पाडागळे यांच्या सहीनिसी त्यांना सदर निवडीचे पत्र देण्यात आले.

त्यांच्या या निवडीचे सर्वत्र मित्र परिवारा मध्ये आभिनंदन केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या