spot_img
spot_img
spot_img

केदारलिंग ट्रस्ट गावचे वैभव: राजशेखर महास्वामी, गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्तांचा सत्कार 

 

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

श्री केदारलिंग मंदिर ट्रस्ट हे जळकोट गावचे वैभव आहे. हे वैभव टिकवण्यासाठी राजकर्त्यांनी व तरुणांनी पुढाकार घ्यावा. असे प्रतिपादन नंदगाव विरक्त मठाचे मठाधिपती राजशेखर महास्वामी यांनी जळकोट येथे केले. जळकोट येथील श्री केदार लिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना राजशेखर महास्वामी हे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळकोट येथील श्री सिद्धेश्वर कट्टीमट संस्थांनचे मठाधिपती श्री. श्री. श्री.१०८ष. ब्र. शिवानंद शिवाचार्य महास्वामी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सत्कार कार्यक्रमात शिवानंद शिवाचार्य महास्वामी यांना उजनी (कर्नाटक) पिठाचा सद्गुरु शिरोमणी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रथम सत्कार करण्यात आला.व रामचंद्र दादा आलुरे यांना आदर्श संस्था चालक हा पुरस्कार, उबाठा सेनेच्या तुळजापूर तालुका संघटकपदी कृष्णात मोरे, रिपाईच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी अरुण लोखंडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक देविदास राठोड, शिवाजी राठोड, गणेश चव्हाण, रमाकांत माळी, केदारलिंग ट्रस्टला फॅन भेट दिल्याबद्दल ग्रा. पंचायत सदस्य संजय माने, ग्रा. पंचायत सदस्य संजय अंगुले, गिरीश नवगिरे, मद्रास येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या सर्वोच्च शिखर संस्थेतून एम.टेक. पदवी मिळाल्याबद्दल आदित्य संजय छत्रे, नेट परीक्षेत यश मिळालेल्या राजलक्ष्मी किलजे, सीईटी परीक्षेत यश मिळवलेल्या सुप्रिया विनोद गंगणे, भारतीय डाक विभागात सेवेत दाखल झालेल्या वैष्णवी कागे, गौरी टोम्पे, गायत्री गंगणे , रोहित पाटील यांचा व इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी केदारलिंग ट्रस्टचे अध्यक्ष बाबुराव पटणे, भीमाशंकर नळगे, जळकोट गावचे सरपंच गजेंद्र कदम, तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आशिष सोनटक्के, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विकास चुंगे, तंटामुक्त अध्यक्ष यशवंत कदम, महेश कदम,पत्रकार विजय पिसे, मेघराज किलजे , रामशेट्टी पाटील,अनिल छत्रे, सुभाष पाटील, नागनाथ मेगशेटी, राम किलजे, नागनाथ किलजे, अर्जुन यादगौडा व सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या