spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग ग्रामीण मंडळ भाजपा कार्यकारणी निवडी जाहीर : भाजपा नळदुर्ग ग्रामिण मंडळ अध्यक्षा रंजनाताई राठेड यानी माध्यमाना दिले सदर निवडीचे प्रसिध्दी पत्रक

वागदरी(एस.के.गायकवाड) :- भारतीय जनता पार्टी तुळजापूर विधानसभा अंतर्गत नळदुर्ग ग्रामीण मंडळाच्या विविध मोर्चा मंडळ अध्यक्ष – उपाध्यक्ष , कोषाध्यक्ष , सरचिटणीस- चिटणीस पदाच्या नुतन निवडी जाहीर करण्यात आले असून भाजपा नळदुर्ग ग्रामिण मंडळाच्या अध्यक्षा रंजनाताई विलास राठोड यानी माध्यमाना दिले सदर निवदीने प्रसिद्धी पत्रक.

भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर , जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग ग्रामीण मंडळाच्या अध्यक्षा रंजनाताई विलास राठोड यांनी सदर निवडी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवडी जाहीर केल्या आहेत.त्या पुढील प्रमाणे भाजपाच्या नळदुर्ग ग्रामीण मंडळ महिला मोर्चा मंडळ अध्यक्षपदी रेणुकाताई इंगोले लोहगाव, युवा मोर्चा मंडळ अध्यक्षपदी विक्रांत दुधाळकर , अणदूर किसान मोर्चा मंडळ अध्यक्षपदी अंगद जाधव बोळेगाव , ओबीसी मोर्चा मंडळ अध्यक्षपदी उमेश गोरे शहापूर , अल्पसंख्यांक मोर्चा मंडळाध्यक्षपदी फिरोज मुजावर इटकळ , अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्षपदी विठ्ठल घंटे निलेगाव तर भाजपा नळदुर्ग ग्रामीण मंडळ उपाध्यक्षपदी राधा मिटकर वागदरी , विवेकानंद मेलगिरी सिंदगाव , प्रवीण भोसले गंधोरा आदींची निवडी करण्यात आली . कोषाध्यक्षपदी नळदुर्ग ग्रामीण मंडळ वसंत रामा पवार जळकोटवाडी नळ याची निवड करण्यात आली आहे . सरचिटणीस पदी संजय मोटे चिकुंद्रा , पद्माकर जेवळे सराटी, तर चिटणीस पदी सतीश काटे नंदगाव , ज्ञानेश्वर , पाटील होर्टी, रेश्मा घंटे केशेगाव , किशोर सुरवसे वागदरी , गणेश सूर्यवंशी आणदुर, आदिती कुलकर्णी हंगरगा नळ , गौरी सालगे खुदावाडी आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या निवडीचे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱी व कार्यकर्त्यातून अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या