जातीय सलोखा कायम राहावा म्हणून बौद्ध नागरिकांची प्रशासनाकडे मागणी
नळदुर्ग दादासाहेब बनसोडे
नळदुर्गच्या ऐतिहासिक नगरीत भीमनगर नालंदा बौद्ध विहारा मध्ये तथागतांनी दिलेला बौद्ध धम्म हा कल्याणाचा मार्ग सांगतो , समता समानता आणि अखंडता ज्या धम्मा मधुन मिळते ते संस्कार आपणाला मिळतात ते संस्कार गेल्या दस शतका पासून नळदुर्ग येथील बौद्ध विहारात चालतात नळदुर्ग आमचे धर्मगुरू बौध्दाचार्य दादासाहेब दुष्यंत बनसोडे व बौद्धधर्मगुरु पुज्य भन्ते सतत बौद्ध विहारात संस्कार विधिसाठी येत आसतात बौद्ध विहाराच्या बाजुल आणि बौद्ध विहाराच्या परिसरात नागरिक आपल्या स्वतःच्या जागेवर कबाड कष्ठ करून आपल्या कुटुंबाची खळगी भरतात परंतू भिमनगर मध्ये बौद्ध विहाराची वास्तू श्रमदानातून उभारली गेली आहे ती वास्तू खुप जुनी आहे . याच बौद्ध विहाराच्या बाजूला करोडो रुपये खर्च करून शादीखाना सभागृहाचे बांधकाम चालू आहे तो शादीखाना शासकीय गावठाण जमिनीवर असून याची नोंद वर वक्फ बोर्डाला १९८४ ला लावली गेली आहे परंतु भीमनगर मधील जे दलित जनता आपल्या कुटुंबाचा उदाहरण निर्वाह करते ती जनता गेल्या अनेक शतका पासून त्याच ठिकाणी वास्तव्यास राहतात मग ही नोंद आली कुठून हे ही चौकशी करणे गरजेचे आहे
कारण काही असंतुष्ठ लोकांनी दलित जनतेला अंधारात ठेवून हा डाव साधल्याचे दिसून येत आहे कारण तेथील राहात्या दलित बौद्ध जनतेकडे १९५२ ते १९५६ च्या नोंदी आसुन त्या वेळचे ८ अ चे दाखले आपणाकडे उपलब्ध आहेत त्याची नगर पालिकेला नोंद सुद्धा आहे मग हा खोडसळ पणा कशासाठी परंतू काही मंडळी नळदुर्ग शहरात स्वतः ची पोळी भाजून घेण्यासाठी हा प्रयत्न चालू आसल्याचे दिसुन येत आहे शादीखान्याचे बांधकाम डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारा च्या बाजुलाच म्हणजे रस्त्यावर शादीखाना प्रवेशद्वार होत असल्याचे संकेत मिळत असून हा जातिवाद आणि खोडसळपणा काही नागरिक जाणून-बुजून करण्याचा चंग बांधला आहे आसे दिसून येत आहे कारण करोडो रुपये खर्ची करून बांधण्यात येत असलेला शादीखाना सभागृहामुळे समाजा व समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो हे टाळण्यासाठी प्रशासनाने या चालू आसलेल्या शादीखाना बांधकामाची चौकशी करून त्या कामाचा मनाई आदेश काढावा आशा प्रकारची मागणी दलित बौद्ध जनतेनी प्रशासनाकडे केली आहे . ते निवेदनात म्हटले आहे की,शादीखाना या बांधकामासाठी नळदुर्ग नगर परिषदेची ना हरकत आहे का? शिवाय नॅशनल हायवे पासुन नॅशनल हायवेच्या नियमा प्रमाणे जागा सोडली आहे का किंवा नॅशनल हायवेची परवानगी किंवा ना हारकत घेतले आहे का या संदर्भात सुद्धा प्रशासनाने चौकशी करणे गरजेचे आहे . कारण याच बौद्ध विहारात बौद्ध धम्माचे २४ प्रकारचे शिबीर आयोजित केले जातात .
वक्फ बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी दलित जनता राहाते त्याची नोंद आम्ही कशी करून घ्यावी आशा प्रकारची जाग सुद्धा आली नाही का? कारण दलित जनता शतको नि शतके वडिलोपार्जित या जागेवर गेले अनेक वर्षापासून राहत आहे याची नोंद वफ्क बोर्डाने १९८४ ला केली आहे दलित नागरीक अनेक शतकापासून आहे येथे राहतात याची सुद्धा प्रशासनाने चौकशी करावी शिवाय याच होऊ घातलेल्या शादीखाना सभागृहाच्या समोरील बाजुस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चालू असून त्याच ठिकाणी अंगणवाडी सुद्धा चालू आहे याच बरोबर महिलांसाठी खास बांधकाम करण्यात आलेले सुलभ शौचालय सुद्धा आहे पूर्वजांनी दलितांसाठी प्राचीन काळाची विहीर याठिकाणी आहे ती आजतागायत वापरात आहे मग अशा ठिकाणी शादीखाण्याचे काम चालू आहे आणि काही असंतुष्ट नागरी हे सर्व ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत अशा बांधकामाना प्रशासनाने तात्काळ कारवाई करून ते काम बंद करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन अप्पर तहसील कार्यालयाचे अप्पर तहसीलदार पी एस गायकवाड नळदुर्ग नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक खालील शेख यांना देण्यात आहे
या निवेदनावर धर्मगुरू बौद्धाचार्य दादासाहेब दुष्यंत बनसोडे विश्वस्त बौद्ध विहार मंडळ नळदुर्ग , किशोर नळदुर्गकर विश्वस्त बौध्द वि मं न, प्रकाश गायकवाड विश्वस्त बौद्ध वि मं न , सचिन कांबळे विश्वस्त बौद्ध वि मं न , ॲड अभिजीत बनसोडे , मधुसूदन दुरुगकर , अमोल कांबळे , अश्वजीत कांबळे पद्माकर पुजारी [ माजी सैनिक ] विठ्ठल बापू बनसोडे , ऋषिकेश कांबळे , अक्षय कांबळे , राहुल श्रीमंत बनसोडे , अजयकुमार बागडे, सुभाष कांबळे , राजेश बनसोडे , योगेश सुरवसे , तुषार गायकवाड , अमर बनसोडे , वैभव कांबळे मुकेश लोखंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत






