spot_img
spot_img
spot_img

तुळजापूर येये प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने जाहीर निषेध : तहसिलदार याना दिले निवेदन 

वागदरी (एस. के.गायकवाड): मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने निषेध करून माथेफिरू आरोपी असलेला दीपक काटे याला शिक्षा देण्यात यावी असा आशयाचे तहसीलदार तुळजापूर यांना निवेदन दिले आहे.

दरम्यान महाराष्ट्र शासनाने पारित केलेले जनसुरक्षा विधेयक त्वरित मागे घेण्यात यावे,अशी मागणी देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. दिलेल्या मागण्या मान्य न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उग्र आंदोलन करेल असा इशाराही निवेदनात दिला आहे.तहसिलदार तुळजापूर याना देण्यात आलेल्या

निवेदनावर मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष तानाजी कदम संजय शितोळे रोजगार आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष,प्रकाश कदम तालुकाध्यक्ष, अरुण कदम शहराध्यक्ष,विक्रांत हावळे तालुका उपाध्यक्ष,विष्णू सोनवणे युवक तालुका अध्यक्ष अमोल कदम युवक शहराध्यक्ष,अशोक कांबळे सल्लागार,धम्मशील कदम तालुका संपर्कप्रमुख, आप्पा कदम रोजगार आघाडी अध्यक्ष रवि वाघमारे रोजगार आघाडी शहराध्यक्ष तानाजी डावरे महादेव सोनवणे दाजी माने तालुका उपाध्यक्ष राज कदम सुशील कदम श्रीमंत चंदनशिवे ज्ञानदेव कदम चोकोबा शिरसाट चंचल कदम चेतन सोनवणे अविनाश भगत झुंबर चंदनशिवे दत्ता हावळे विकास कदम अशोक देशमुख हिरा सोनवणे शरणाथ कदम आदींच्या सह्या आहेत.

यां प्रसगी आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या