spot_img
spot_img
spot_img

येडोळा येथे वर्षावास निमित्ताने बुद्ध वंदना व धम्मदेशना कार्यक्रम संपन्न

वागदरी (एस.के.गायकवाड) :

धाराशिव जिल्ह्यातील मौजे येडोळा ता.तुळजापूर येथे वर्षावास निमित्ताने सामुदायिकरित्या बुद्ध वंदना व धम्म देशना कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

आषाढी पोर्णिमा ते आश्विनी पोर्णिमा हा तिन महिन्याचा पावसाळी काळ बौद्ध धम्मात वर्षावास म्हणून (वर्षा म्हणजे पाऊस,वास निवास किंवा मुक्काम ) पाळला जातो. या काळात बौद्ध बांधवांच्या वतीने धम्म प्रसार आणि प्रचाराच्या दृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते,त्याचाच भाग म्हणून भारातिय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिव आणि न्यू सिद्धार्थ बुद्ध विहार कमिटी व न्यू सिध्दार्थ कला व क्रिडा मंडळ येडोळ ता.तुळजापूर च्या वतिने येथिल भिमनगर येथे सामुदायिक रित्या बुद्ध वंदना व धम्मदेशना (प्रवचन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतिय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्षा राजश्री कदम ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ कार्यकर्ते विश्वास भाऊ पांडागळे, तुळजापूर तालुका सरचिटणीस राकेश जेटीथोर आदी होते.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुध्द व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेण्यात आली.यावेळी बोलतान राजश्री कदम म्हणाल्या की बौद्ध धम्म हा मानवाला मानवतेची शिकवन देणारा धम्म असून मानवाला आनंददायी जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो तेंव्हा तथागत भगवन गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून ते अचरनात अनावे.या प्रसंगी विश्वास भाऊ पांडागळे, राकेश जेटीथोर यांचे ही भाषाणे झाली.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन अमर जेटीथोर यानी केले.या वेळी देवानंद लोंढे, सुरेश लोंढे,भानुदास लोंढे,अंकुश लोंढे, प्रवीण कांबळे, गौरव लोंढे,सुरज लोंढे,अभिषेक लोंढे,गोवर्धन लोंढे मारुती लोंढे,सुमित लोंढे,अमित लोंढे,सुवर्णा लोंढे,रागिणी लोंढे सुनिता लोंढे,विशाल लोंढे,सविता लोंढे,माधवी लोंढे,कान्होपात्रा साळूबाई लोंढे,रतन लोंढे,स्नेहा लोंढे,आकांक्षा लोंढे नागेश लोंढे, उषा लोंढे, शितल लोंढे, सृष्टी लोंढे, सारिका लोंढे,रेखा लोंढे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या