ऐतिहासिक किल्ला संवर्धनासाठी पाठपुरावा करणार पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सपत्नीक ऐतिहासीक किल्ल्याला भेट .
नळदुर्ग दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग शहर व विकास आराखडा यामध्ये समाविष्ट कामे आहेत ते पुर्ण करण्याकरीता महाराष्ट्र सरकार तत्पर आहे नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्याला महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती
नळदुर्ग येथे ऐतिहासिक किल्ल्याला महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना प्रताप सरनाईक यांनी सपत्नीक भेट दिली व मनमुराद आनंद लुटला
नळदुर्ग ऐतिहासिक शहरातील किल्ल्याची बारादरी पर्यंत पाहाणी केली आणि किल्ला संवर्धन या विषयाला अनुसरून पत्रकारानी प्रश्न विचारला आसता किल्ला सुशोभीकरण संवर्धन आसो किंवा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही बाबींकडे लक्ष केंद्रित करू व आशा किल्ल्यातील सर्व गोष्टी आहेत या संदर्भात मा जिल्हाधिकारी यांना सुचना दिल्या आहेत या बद्दल ते पाठपुरावा करतील यात शंका नाही बी ओ टी तत्वावर देण्यासाठी प्रयत्नात आहोत पण हा ही प्रश्न लवकर मार्गी लावू 
शिवाय नळदुर्ग तालुका निर्मिती साठी तालुका स्तरावर सोयी सुविधा उपलब्ध आसतील तर नक्कीच नळदुर्ग तालुका होईल आसे प्रतिपादन धाराशिवचे पालकमंत्री मा ना प्रताप सरनाईक यांनी केले यावेळी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजारा , उमरगा – लोहारा विधानसभा माजी आमदार ज्ञानराज चौगुले , तुळजापूर चे तहसिलदार अरविंद बोळंगे , उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख ,नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार , अप्पर तहसिलदार प्रमोद गायकवाड , नळदुर्ग ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव सपोनि नंदकिशोर सोळुंके , पोलीस उपनिरीक्षक इश्वर नांगरे , यांच्या सह शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके , निखिल घोडके , अमोल कांबळे यूनिटीचे तन्वीर शेख , लहुजी शक्तीसेनेचे नेते शिवाजी गायकवाड , सह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक संस्था संघटना व परिसरातील नागरीकानी अनेक विविध समस्या आसल्यामुळे निवेदन देण्यात आले .
यावेळी किल्लेदार नागनाथ गवळी कंत्राटी कर्मचारी प्रणाल गवळी , मारुती पिस्के कर्मचारी जयभिम वाघमारे यांनी किल्ल्याची सविस्तर माहिती सांगीतली






