अणदूर प्रतिनिधी ,येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि साप्ताहिक भगवा प्रांत चे सहसंपादक संघर्ष बांधकाम कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष, दलीत चळवळीतील अभ्यासू, परखड, स्वाभिमानी चेहरा म्हणून धाराशिव जिल्ह्यातून आर एस गायकवाड यांना ओळखले जाते.त्यांची वंचित बहुजन धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मराठवाडा बांधकाम कामगार असोशियशन अणदूर, यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठवाडा बांधकाम कामगार असोशियशन अध्यक्ष राजाराम चंदनशिवे, उस्मान नदाफ, सुनील बनसोडे, नारायण सुतार, संदिप साबळे, यांच्या सह बांधकाम कामगार उपस्थित होते.आर एस गायकवाड यांची वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बांधकाम कामगारांना अत्यानंद झाला आहे.बांधकाम कामगार संघटनेत उत्साह संचारला आहे.






