नंदगाव (शाम नागिले ) तुळजापूर तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड व संवर्धन कार्यक्रमा अंतर्गत आज नंदगाव येथे उपसरपंच तथा प्रभारी सरपंच सौ.महादेवी भीमराव चिनगुंडे आणि कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक सिद्धेश्वर कोरे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षलागवड कार्यक्रम संपन्न झाला.
या बाबत सविस्तर असे की , तुळजापूर तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड व संवर्धन कार्यक्रमा अंतर्गत आज नंदगाव येथील जिल्हा परिषद शाळेत 10 गुंटे म्हणजे 3300 वृक्ष लागवड करण्यात आले या वेळी ग्राम पंचायत सदस्य शशिकांत नागिले, धंनराज कलशेट्टी,ग्रामपंचायत अधिकारी राहुल कांबळे साहेब ,कृषी सहाय्यक माने साहेब ,तलाठी पांडुरंग थोरात साहेब , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री.वाकडे सर,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रभाकर राठोड सर ,पत्रकार शाम नागिले ,सामाजिक कार्यकर्ते सतीश काटे , परमेश्वर चिनगुंडे ,विश्वजित घंटे ,श्रद्धांनंद कलशेट्टी , संतोष कांबळे ,मल्लिनाथ गुड्डे, पोलिस पाटील किरण भाले ,शालेय समिति अध्यक्ष सतीश बशेट्टी , रोहिदास कांबळे ,अशोक वाले, अंगणवाडी ताई, आशा कार्यकर्ती, महिला बचत गट,उमेद गट ,शाळेतील शिक्षक वृंद ,ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी सह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत सादर करण्यात आले .त्यानंतर वृक्ष लागवडीची शपथ सर्वांना देण्यात आली ही शपथ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री.वाकडे सर यांनी दिली.यावेळी गावातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सर्वप्रथम सरपंच/ उपसरपंच सर्व सदस्य व नागरिकांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला .सर्व विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था तलाठी कार्यालयाच्या वतीने करण्यात आली होती .अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम संपन्न झाला. आज जवळपास 3300 वृक्ष लागवडीचा शुभारंभ नंदगाव येथे करण्यात आला असून ,तुळजापूर तालुक्यातील एकूण 32 गावांमध्ये 3.60 हेक्टर वर आज हा कार्यक्रम संपन्न झाला. यात नंदगाव मध्ये ही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धाराशिवचे जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पूजार यांच्या या महत्वकांक्षी संकल्पनेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद दिसून आलेला आहे .संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज फार मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत ला त्यांनी टार्गेट दिले आहे आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा या कामांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाली असून लोकसहभाग ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.






