spot_img
spot_img
spot_img

भाजपाच्या वतीने नळदुर्ग येथे आयोजि रक्तदान शिबिरात रक्तदात्यानी गाठला उच्चांक : १८३ रक्त दात्यानी केले रक्तदान

 

वागारी (एस.के. गायकवाड):

राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांच्या वाढदिवसा निमित्ताने भाजपाच्या वतीने नळदुर्ग ता.तुळजापूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात आतापर्यंत येथे झालेल्या रक्तदान शिबिरापेक्षा सर्वाधिक उच्चांक गाठला असून तब्बल १८३ रक्तदात्याने रक्तदान केल्याची नोंद झाली आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यामान लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणविस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्ताने भारतिय जनता पार्टी नळदुर्ग मंडल व तुळजापूर तालुका ग्रामिण मंडलाच्या वतीने नळदुर्ग ता. तुळजापूर येथिल लोकमान्य वाचनालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजान करण्यात आले होते.

सर्व श्रेष्ठ दान रक्तदान या भावनेतून नळदुर्ग व परिसरातील रक्त दात्यानी उस्पूर्त प्रतिसाद देत तब्बल १८३ रक्तदात्यानी या शिबिरात रक्त दान करून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस उर्फ देवा भाऊ याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अँड. दिपक दादा अलूरे, तांडा सुधार योजनेले अशासकीय सदस्य विलास राठोड,माजी नगराध्यक्ष नय्यरपाशा जहागीरदार आदीनी या शिबिरास भेट देवून रक्तदात्यांचे आभिनंदन केले.

भाजपा नळदुर्ग मंडल अध्यक्ष बसवराज धरणे, तुळजापूर तालूका ग्रामिण मंडल अध्यक्ष सौ.रंजनाताई विलास राठोड, भाजपाचे सुशांत भुमकर, संजय बताले,धिमाजी घुगे,साहेबराव घुगे,कल्पनाताई गायकवाड, छमाबाई राठेड, भिवाजी इंगोले, महादेव सालगे, किशोर धुमाळ, उमाजी गोरे, शरणाप्पा कबाडे, अमर नरवडे, युवराज पाटील, सचिन घोडके, दयानंद मुडके, गणेश मोरडे,श्रमिक पोतदार, विनायक अहंकारी, किशोर नळदुर्गकर,प्राविण घोडके,पद्माकर घोडके, निरंजन राठोड सह परिसरातील कार्यकर्ते यानी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

यावेळी हेडगेवार रक्त पेढी सोलापूर चे जनसंपर्क अधिकारी सुशांत कुलकर्णी, सौ.नभा घाटे, सौ. दिवा कुलकर्णी,सौ.माधुरी शिंदे,सौ.मंगल कुंभार, अक्षय पाटील, सतिश पुजारी, राजू गुजर, अरविंद कुलकर्णी, प्रतिक मडिवाळ आदीनी रक्त संकलनाचे काम चोख बजावले.

Related Articles

ताज्या बातम्या