नळदुर्ग शहरात १८३ रक्तदात्यानी केले रक्तदान
नळदुर्ग दादासाहेब बनसोडे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २२ जुलै रोजी नळदुर्ग येथे भारतीय जनता पार्टी नळदुर्ग शहर मंडळ व नळदुर्ग तालुका ग्रामिण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी तब्बल १८३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दि. २२ जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नळदुर्ग येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी नळदुर्ग शहर मंडळ व नळदुर्ग तालुका ग्रामिण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकमान्य वाचनालयाच्या सभागृहात हे रक्तदान शिबीर पार पडले. या रक्तदान शिबिरात नळदुर्ग शहर तसेच ग्रामिण भागातील रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने रक्तदान केले. रक्तदान मोठया प्रमाणात येशस्वी व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टी नळदुर्ग शहर मंडळाचे अध्यक्ष बसवराज धरणे व नळदुर्ग तालुका ग्रामिण मंडळाच्या अध्यक्षा रंजना विलास राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे परीश्रम घेतले. या रक्तदान शिबिरात १८३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्त संकलन करण्याचे काम सोलापुर येथील डॉ. हेगडेवार रक्तपेढी या रक्त पेढीने केले.
प्रारंभी तुळजापुर तालुक्याचे युवा नेते व श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी,सुशांत भुमकर, भाजपचे नळदुर्ग शहर मंडळचे अध्यक्ष बसवराज धरणे, नळदुर्ग तालुका ग्रामिण मंडळाच्या अध्यक्षा रंजना राठोड, माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, नय्यर जहागीरदार, माजी नगरसेवक संजय बताले, किशोर नळदुर्गकर, निरंजन राठोड, सुधीर हजारे,विनायक अहंकारी, संजय विठ्ठल जाधव,माजी नगरसेविका छमाबाई राठोड, कल्पना गायकवाड,श्रमिक पोतदार,पद्माकर घोडके, धीमाजी घुगे, गणेश मोरडे, बबन चौधरी,ऍड. दीपक आलुरे, साहेबराव घुगे,विलास राठोड, सचिन घोडके,दयानंद मुडके,पद्माकर जेवळे, किशोर धुमाळ,सुरेश बिराजदार, विवेकानंद मेलगिरे,सचिन घोडके प्रविण घोडके,युवराज पाटील, मल्लिनाथ गावडे, नाना काझी,उमेश गोरे, प्रविण पाटील, शरणप्पा कबाडे,अमर नरवडे,निलेश आलुरे, इमाम शेख,दिलीप सोमवंशी,पांडुरंग पुदाले, उमेशनाईक,संदीप गायकवाड,जमन ठाकुर, अक्षय भोई,मुजीब शेख, रीयाज शेख,अभिजित लाटे, सागर हजारे,आबेद इनामदार, वैभव पाटील, पप्पु पाटील,मारुती घोडके,मुकुंद नाईक, अतुल भोसले, सलीम बागवान,मुदस्सर शेख,संजय मोरे, विक्रांत दुरुगकर,दीपक घोडके यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






